काळबादेवी आग: अग्निशमन दलाच्या दोन अधिकाऱ्यांचा मृत्यू

काळबादेवी इथं हनुमान गल्लीत अग्नितांडवानं धुमाकूळ घातला होता. या आगीत सहा जण जखमी झालेत. तसंच आग विझवताना अग्निशमन दलाच्या २ जवानांना वीरमरण प्राप्त झालंय. 

Updated: May 10, 2015, 03:00 PM IST
काळबादेवी आग: अग्निशमन दलाच्या दोन अधिकाऱ्यांचा मृत्यू title=

मुंबई: काळबादेवी इथं हनुमान गल्लीत अग्नितांडवानं धुमाकूळ घातला होता. काळबादेवीतील गोकुळनिवास इमारतीला भीषण आग लागली होती. ही आग इतकी भीषण होती की ती विझवण्याकरता अग्निशमन दलाच्या ३५ गाड्यांना पाचारण करण्यात आलं होतं. या आगीत सहा जण जखमी झालेत. तसंच आग विझवताना अग्निशमन दलाच्या २ जवानांना वीरमरण प्राप्त झालंय. 

अत्यंत अरुंद जागेत ही इमारत असल्यामुळं आग विझवण्यासाठी अडचणी येत होत्या. आग लागल्यानंतर कोसळलेल्या बिल्डिंगच्या ढिगाऱ्यात अडकलेल्या एन. एम. देसाई आणि संजय राणे या दोन जवानांना उपचारांकरता जीटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र डॉक्टरांनी हॉस्पिटलमध्ये दोघांनाही मृत घोषित केलं.

तसंच अग्निशमन दलाचे जवान एस. जी. अमीन यांचीही परिस्थिती चिंताजनक आहे. ते ८० टक्के भाजले असून, त्यांच्यावर ऐरोलीच्या नॅशनल बर्न सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. तर चीफ फायर ऑफिसर सुनील नेसरीकर हे सुद्धा ४० टक्के भाजले असून, त्यांनाही पुढील उपचारांकरता ऐरोलीला हलवण्यात आलं आहे. या आगीचं नेमकं कारण अद्यापही समजू शकलेलं नाही.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.