jalgaon

जळगाव भाजपमध्ये गटबाजी उफाळली, महाजन- खडसे समर्थक आक्रमक

 भाजपमधील दोन गटांमधील वितुष्ट संपता संपत नाही, असेच चित्र दिसून आले. आज झालेल्या पक्ष पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे आणि जलसंपदा मंत्री महाजन यांनी एकाच व्यासपीठावर एकत्र येणे टाळले.

Aug 26, 2017, 05:31 PM IST

जळगाव महापौरांचा तडकाफडकी राजीनामा आणि रडू कोसळले

माजी मंत्री सुरेश जैन यांच्या आदेशानंतर जळगाव महापालिकेचे महापौर नितीन लढ्ढा यांना तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागलाय. 

Aug 24, 2017, 06:35 PM IST

७ बलून बंधाऱ्यांच्या प्रकल्पाला हिरवा कंदील

जिल्ह्यातील बहुप्रतीक्षीत गिरणा नदीतील प्रवाही पाणी अडविण्याकरिता प्रस्तावित असलेल्या ७ बलून बंधाऱ्यांच्या प्रकल्प अहवालास अखेर राज्यपालांनी संमती दिलीय.

Aug 24, 2017, 05:12 PM IST

हाफकीनचा सावळा गोंधळ, एका अधिकाऱ्यावर चार विभागांची जबाबदारी

बंद पडलेल्या हाफकीन कंपनी प्रशासनाचे एकेक किस्से समोर येताय. जळगावच्या हाफकीन कंपनीमधून गेल्या काही वर्षांत निवृत्त झालेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या जागेवर एकाही नव्या कर्मचा-याची नियुक्ती झालेली नाही.

Aug 23, 2017, 10:49 PM IST

'हाफकिन' युनिट गेल्या दीड वर्षांपासून बंद

गरिबांना परवडणाऱ्या किंमतीत औषधे निर्माण करणाऱ्या हाफकिन या कंपनीचे जळगाव एमआयडीसीमधील युनिट गेल्या दीड वर्षांपासून बंद आहे.

Aug 22, 2017, 09:26 PM IST

जळगावात धनिकांना लुटणारी टोळी गजाआड

मोबाईल क्रमांक मिळवून जळगावात सधन, शेतकरी, व्यापारी तसंच धनिक लोकांना लुटणारी महिलांची टोळी रामानंदनगर पोलिसांनी अटक केलीय. 

Aug 18, 2017, 07:02 PM IST

किशोरवयीन मुलींच्या समस्या सोडवण्यासाठी...

किशोरवयीन मुलींच्या समस्या सोडवण्यासाठी... 

Aug 16, 2017, 03:10 PM IST

किशोरवयीन मुलींच्या समस्या सोडवण्यासाठी...

वयात येणाऱ्या मुलींच्या शारीरिक आणि मानसिक समस्या मोठ्या पण त्या कुणापुढे मांडाव्या त्यावर उत्तर कसं शोधावं? असा प्रश्न प्रत्येक मुलीला असतो. मुलींचे पालकही या समस्येनं हैराण असतात. हीच समस्या सोडवण्यासाठी आणि या मुलींना बोलतं करण्यासाठी जळगावात 'रोटरी क्लब ऑफ ईस्ट'नं एक उपक्रम हाती घेतलाय. 

Aug 16, 2017, 01:59 PM IST

जळगाव जिल्ह्यात २ महिन्यानंतर समाधानकारक पाऊस

जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून भिजवणारा पाऊस सुरु असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केलं जातंय. जोरदार पावसाची प्रतीक्षा असल्याने जिल्ह्यातील बहुतांशी धरणांमध्ये मात्र अजून पुरेसा पाणीसाठा साचलेला नाही. 

Jul 28, 2017, 07:03 PM IST