indian olympians

शोभा डे यांना खेळातलं काय कळतं?

शोभा डे यांना खेळातलं काय कळतं? त्यांनी कधी खेळाडू कशी मेहनत घेतात हे पाहिलं आहे का? विशेषतः ग्रामीण भागातील खेळाडू आणि महिला खेळाडू कसा संघर्ष करून इथपर्यंत मजल मारतात हे त्यांना ठाऊक आहे का?  आपल्याकडे क्रीडा संस्कृतीच नाही, सुविधांची वाणवा याबाबत त्यांना काही कल्पना आहे का?  की उगाच आपली बुद्धिमत्ता दाखवायची? शरीर सुंदर दिसण्यासाठी रोज केवळ एखादा तास योगा करण्यासारखं ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळवणं सोप नाही. हे या अतिहुशार बाईंना कोण सांगणार? ट्विट  करण्याएवढं ऑलिम्पिक मेडल  पटकावणं सोप नसतं, खेळाडू आपलं पूर्ण तारुण्य पणाला लावतात. क्रिकेट खेळाएवढं ऑलिम्पिक मेडल सोप नाही. क्रिकेटमध्ये 10-15 देश खेळतात. त्यातही अनेक आशियाई देशांना युरोपच्या संघाशी  क्रिकेटला मुकाबलाच करावा लागत नाही. हे या बाईंना कोण समजावणार ? 

Aug 9, 2016, 09:27 PM IST