icj

कुलभूषण जाधव प्रकरणात पाकिस्तानकडून पुन्हा याचिका दाखल

पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांच्या फाशीवर रोख लावल्यानंतर आणि त्यांना काऊंसिलर देण्याच्या आंतरराष्ट्रीय कोर्टाच्या निर्णयावर पुन्हा रिव्यू पिटीशन दाखल केली आहे.

May 20, 2017, 10:33 AM IST

कुलभूषण जाधव प्रकरण : पाकिस्तानी वकिलांची फी माहीत आहे का?

पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी भारत सरकारकडून वकील हरीश साळवे यांनी केवळ एक रुपया मानधन म्हणून घेतलं... पण, तुम्हाला हे माहीत आहे का की पाकिस्तानची बाजू आंतरराष्ट्रीय न्यायालयात मांडण्यासाठी पाकिस्तानचे वकील खैबर कुरैशी यांनी किती मानधन घेतलं...?

May 19, 2017, 10:18 PM IST

कुलभूषण जाधव प्रकरणी धक्का, फोडले वकिलावर खापर...

 आंतरराष्ट्रीय कोर्टात कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या आदेशाला स्थिगिती मिळाली आहे. या निर्णयानंतर पाकिस्तान बिथरले आहे. सरकार ते नागरिकांमध्ये खळबळ माजली आहे.  आता पाकिस्तानच्या विविध पक्षांचे नेते आणि जाणकार हा दावा करतात आहे की, त्यांचे सरकार योग्य प्रकारे आंतरराष्ट्रीय कोर्टात आपली बाजू मांडण्यात अपयशी ठरले. त्यामुळे कोर्टाने भारताच्या बाजूने निकाल दिला आहे. 

May 18, 2017, 07:30 PM IST

पाकिस्तानचा रडीचा डाव, पाहा काय केलं

 आंतरराष्ट्रीय कोर्टानं चपराक लगावल्यानंतरही पाकिस्तानचा रडीचा डाव सुरूच आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निकाल पाकिस्तानला मान्य नसल्याचं पाक परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते नफीज झकेरीयांनी सांगितलंय.

May 18, 2017, 07:01 PM IST

भाजप आणि काँग्रेसकडून आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत

भाजपा आणि काँग्रेसनं आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. पाकिस्तानचा पर्दाफाश करणारा हा निर्णय असल्याचं भाजपा प्रवक्ते नलीन कोहली यांनी म्हटलं आहे. तर काँग्रेस प्रवक्ता मनिष तिवारी यांनी केवळ स्थगितीवर समाधान न मानता कुलभूषण जाधवांना परत आणण्यासाठी सरकारनं प्रयत्न केले पाहिजेत, असं म्हटलं आहे.

May 18, 2017, 05:21 PM IST

जाधव यांना गुप्तहेर म्हणता येणार नाही - आंतरराष्ट्रीय न्यायालय

आंतरराष्ट्रीय न्यायालयाने भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या फाशीवर स्थगिती आणली आहे. शेवटचा निकाल येईपर्यंत फाशी रोखण्यात आली आहे. कोर्टने स्पष्टपणे म्हटलं आहे की, कुलभूषण जाधवला गुप्तहेर नाही म्हणता येणार. न्यायाधीश रोनी अब्राहम यांनी निकाल देतांना म्हटलं की, जाधव हे गुप्तहेर असल्याचा पाकिस्तानचा दावा मान्य नाही करता येणार. व्हियन्ना करारानुसार भारताला कुलभूषण जाधव यांना कायदेशीर मदत मिळाली पाहिजे. अब्राहम यांनी म्हटलं की, जाधव यांना केलेली अटक हा वादाचा विषय आहे. शेवटचा निर्णय येईपर्यंत जाधव यांच्या फाशीच्या निर्णयावर स्थगिती असली पाहिजे. पाकिस्तानने असा कोणताही मोठा निर्णय घेऊ नये ज्यामुळे बदल्याची भावना निर्माण होईल.

May 18, 2017, 04:48 PM IST

जाधवांच्या शिक्षेच्या स्थगितीनंतर ट्विटरवर प्रतिक्रियांचा पाऊस

भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना पाकिस्ताननं सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेला आंतरराष्ट्रीय न्यायालयानं स्थगिती दिलीय. हेग स्थित आंतरराष्ट्रीय न्यायालयानं अंतिम निकाल येईपर्यंत कुलभूषण जाधव यांना फाशी होणार नाही, याची जबाबदारी पाकनं घ्यावी, असा सज्जड दम दिलाय. 

May 18, 2017, 04:41 PM IST

कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय कोर्टात उद्या लागणार निकाल

भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्यावरील खटल्याबाबत उद्या आंतरराष्ट्रीय कोर्टात निकाल जाहीर होणार आहे. तीन दिवसांच्या सुनावणीनंतर उद्या निकाल जाहीर केला जाणार आहे. 

May 17, 2017, 08:56 PM IST

कुलभूषण जाधव फाशीच्या शिक्षेविरोधात हरिश साळवे आंतरराष्ट्रीय न्यायालयात

कुलभूषण जाधव यांना पाकिस्ताननं सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेविरोधात ज्येष्ठ विधीज्ञ हरिश साळवे आंतरराष्ट्रीय न्यायालयात बाजू मांडली. यासाठी साळवे यांनी केवळ एक रुपया नाममात्र शुल्क आकारलं अशी माहिती परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विटरवर दिलीय.

May 16, 2017, 12:52 PM IST