कुलभूषण जाधव प्रकरणी धक्का, फोडले वकिलावर खापर...

 आंतरराष्ट्रीय कोर्टात कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या आदेशाला स्थिगिती मिळाली आहे. या निर्णयानंतर पाकिस्तान बिथरले आहे. सरकार ते नागरिकांमध्ये खळबळ माजली आहे.  आता पाकिस्तानच्या विविध पक्षांचे नेते आणि जाणकार हा दावा करतात आहे की, त्यांचे सरकार योग्य प्रकारे आंतरराष्ट्रीय कोर्टात आपली बाजू मांडण्यात अपयशी ठरले. त्यामुळे कोर्टाने भारताच्या बाजूने निकाल दिला आहे. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: May 18, 2017, 07:30 PM IST
कुलभूषण जाधव प्रकरणी धक्का, फोडले वकिलावर खापर... title=

इस्लामाबाद :  आंतरराष्ट्रीय कोर्टात कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या आदेशाला स्थिगिती मिळाली आहे. या निर्णयानंतर पाकिस्तान बिथरले आहे. सरकार ते नागरिकांमध्ये खळबळ माजली आहे.  आता पाकिस्तानच्या विविध पक्षांचे नेते आणि जाणकार हा दावा करतात आहे की, त्यांचे सरकार योग्य प्रकारे आंतरराष्ट्रीय कोर्टात आपली बाजू मांडण्यात अपयशी ठरले. त्यामुळे कोर्टाने भारताच्या बाजूने निकाल दिला आहे. 

कमकुवत होती पाकिस्तानची तयारी...

लंडनमध्ये राहणारे पाकिस्तानी वंशाचे वकील राशिद असलम यांनी डॉन वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, पाकिस्तानची तयारी खूप कमकुवत होती. तसेच पाकिस्तानच्या वकिलांना आपली बाजू मांडण्यासाठी ९० मिनीटांची वेळ मिळाली होती, त्याचा पण उपयोग केला नाही. 

९० मिनिटांपैकी ४० मिनिटे वाया घालवती, आपली बाजू त्यांनी ९० मिनिटे का मांडली नाही, यामुळे मी हैराण असल्याचे असलम यांनी सांगितले. 

विरोधी पक्षाने सरकारला ठरवले जबाबदार 

पाकिस्तान पीपल्स पार्टीचे नेते आणि सिनेटर शयरी रहमान यांनी आपल्या सरकारवर टीकेची झोड उठवत ट्विटरवर आपली नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, आम्ही अशी केस गमावली जी सहज जिंकता आली असती, यात यंत्रणेची अक्षमता आणि बेजबाबदारपणा कारणीभूत आहे. 

वकिलांना अनूभव नाही... 

पाकिस्तानचे माजी अटर्नी जनरल इरफान कादिर म्हणाले,  या निर्णयाचे मला आश्चर्य वाटते. ते म्हणाले, पाकिस्तानकडून जे वकील केस हँडल करत होते, त्यांना अनुभव नव्हता. जी बाजू मांडली ती अत्यंत कमकुवत होती.