हेग : आंतरराष्ट्रीय न्यायालयाने भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या फाशीवर स्थगिती आणली आहे. शेवटचा निकाल येईपर्यंत फाशी रोखण्यात आली आहे. कोर्टने स्पष्टपणे म्हटलं आहे की, कुलभूषण जाधवला गुप्तहेर नाही म्हणता येणार. न्यायाधीश रोनी अब्राहम यांनी निकाल देतांना म्हटलं की, जाधव हे गुप्तहेर असल्याचा पाकिस्तानचा दावा मान्य नाही करता येणार. व्हियन्ना करारानुसार भारताला कुलभूषण जाधव यांना कायदेशीर मदत मिळाली पाहिजे. अब्राहम यांनी म्हटलं की, जाधव यांना केलेली अटक हा वादाचा विषय आहे. शेवटचा निर्णय येईपर्यंत जाधव यांच्या फाशीच्या निर्णयावर स्थगिती असली पाहिजे. पाकिस्तानने असा कोणताही मोठा निर्णय घेऊ नये ज्यामुळे बदल्याची भावना निर्माण होईल.
पाकिस्तानने कोणतेही निर्णय घेण्यापूर्वी कोर्टाला सूचित करावे. पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांना सुरक्षा पुरवावी. पाकिस्तानने जाधव यांच्या प्रकरणात भारतला काउंसलर एक्सेस दिला पाहिजे. भारताने व्हियन्ना करारानुसार केली मागणी योग्य आहे. दोन्ही देश हे मानतात की जाधव भारतीय आहेत.