healthcare

मालेगाव शहरातली आरोग्यसेवा सलाईनवर

मालेगाव शहरातली आरोग्यसेवा सलाईनवर 

Apr 27, 2017, 02:49 PM IST

उपचारा अभावी मुलाचा वडिलांच्या खांद्यावर मृत्यू!

देशातील आरोग्य यंत्रणा मृत्यूचा यमदूत बनत चालली आहे. वेळेत औषध उपचार मिळत नाही. तर गरीब रुग्णांना स्ट्रेचर, अॅंब्युलन्स मिळणास अडचणी येत आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणा कुचकामी ठरत असल्याचे दिसत आहेत. याचे सरकारसह आरोग्य यंत्रणेला देणे-घेणे नसल्याचे दिसत आहे. उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक बाब उघड झालेय. उपचारा अभावी 12 वर्षीय मुलाचा वडिलांच्या खांद्यावरच मृत्यू झाला.

Aug 30, 2016, 04:29 PM IST

पोटातील गॅस सोडणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर

तस पोटातील हवा (गॅस) सोडणे हे खूप कॉमन आहे. पण हीच जेव्हा दहा लोकांसमोर सोडण्याची वेळ येते, तेव्हा मात्र प्रत्येकालाच त्याची लाज वाटते. मात्र एका संशोधनामधून हे समोर आलेय की, यात लाज वाटण्यासारखे काही नाही. उलट ते तुमच्या पचन संस्थेकरिता उत्तम आहे. पोटात जेव्हा गॅस तयार होतो तेव्हा हवा सोडावी लागते. मात्र ही हवा सोडताना नेहमीच आवाज येत नाही.

Jun 11, 2016, 09:00 PM IST

चणे खाण्याचे फायदे ओळखून तुम्हीही व्हाल हैराण!

हरभरे किंवा काळे चणे प्रत्येकाच्या घरात असतात. अनेक लोक याचा भाजीसाठी उपयोग करतात. काही जण उकडून खातात किंवा मोड काढून खातात. चणे खाणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. चण्यातून आपल्याला कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फायबर, कॅल्शिअम, लोह आणि खनिज पदार्भ मोठ्याप्रमाणात मिळतात. तसेच मोड आलेले चणे खाणे अधिक फायदेशीर आहे. मोड आलेल्या चण्यामध्ये क्लोरोफिल, व्हीटॅमिन, ए, बी, सी, डी आणि याबरोबरच फास्फोरस, पोटॅशिअम, लोह यांचे प्रमाण अधिक असते.

Aug 29, 2015, 03:16 PM IST