hail

राज्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस, कोकणात गारपीटीची शक्यता

राज्यात आज काही ठिकाणी गारांसह जोरदार अवकाळी पाऊस झाला. सांगली जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले. तर कोकणात गारपीटीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

Apr 29, 2017, 04:36 PM IST

धुळे, नंदूरबारमध्ये गारपिटीचा कहर

धुळे, नंदूरबारमध्ये गारपिटीचा कहर

Mar 2, 2016, 05:38 PM IST

मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपिटीची शक्यता

मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपिटीची शक्यता

Nov 21, 2015, 10:20 PM IST

अवकाळी पावसाचे १३ बळी, शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं!

 राज्याच्या बहुतांश भागाला शनिवारी अवकाळी पावसासह गारपिटीने झोडपून काढले़ गेल्या अठ्ठेचाळीस तासांत या पावसामुळे आणि गारपीटीमुळे १३ जणांचा बळी गेलाय. वीज कोसळून शुक्रवारी पाच जणांचा तर शनिवारी विविध भागांत वीज कोसळून सहा जणांचा बळी गेला तर इतर दोन दुर्दैवी घटनांमध्ये दोघांचा मृत्यू झाला़. राज्यात बीडमध्ये तीन, बुलडाणा दोन, तर औरंगाबाद, अकोला आणि नंदुरबार जिल्ह्यातील एका मृताचा समावेश आहे़.  

Apr 12, 2015, 04:27 PM IST

नाशिक जिल्ह्यातील पिकं पाच दिवसात भूईसपाट

 जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांमध्ये अवकाळी पावसामुळे तब्बल ३२४ गावांमधील शेतकरी बाधित झाले आहेत. जिल्ह्याभरात सुमारे साडेबावीस हजार हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान या गारपिटीने तर वर्ष्भारात सुमारे सत्तर हजार हेक्टर नुकसान झाले आहे. 

Mar 16, 2015, 07:55 PM IST

नाशिकमध्ये वर्षातली सर्वात मोठी गारपीट, साचला ६ इंचाचा बर्फाचा थर

नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात गारपीट झालीय. वडांगळी परिसरात तर गारपीटीनं अक्षरशः कहर केलाय. गारांचा चक्क सहा इंचांचा थर साचलाय.

Mar 14, 2015, 02:02 PM IST

मुख्यमंत्री आणि राज ठाकरे आज गारपिटग्रस्त भागाच्या दौऱ्यावर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज गारपिटग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत. दुपारी बाराच्या सुमारास मुख्यमंत्री गारपीटग्रस्त भागाची पहाणी करणार आहेत. अवकाळी पाऊस आणि गारपीटीनं शेतीचं मोठं नुकसान झालंय. त्या पार्श्वभूमिवर हा दौरा होत असून गारपीटग्रस्तांसाठी स्पेशल पॅकेज जाहीर होणार का? याकडे गारपिटग्रस्त शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय. 

Dec 14, 2014, 10:37 AM IST

कोकण-पुण्यात अवकाळी पाऊस, उत्तर महाराष्ट्रात गारपीट

 नाशिक आणि धुळे जिल्ह्यात सलग दुस-या दिवशी गारपीटीमुळं पीकांचं मोठं नुकसान झाले आहे. कोकण आणि पुण्यातही अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. तर विदर्भ वगळता राज्यात येत्या ४८ तासांत पावसाची शक्यता कुलाबा वेध शाळेने व्यक्त केली आहे.  

Dec 12, 2014, 06:02 PM IST