gujarat assembly elections 2012

गुजरात - भाजपच्या दोन जागा कमी, काँग्रेसच्या दोन वाढल्या

गुजरात विधानसभेच्या १८२ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपला ११५ जागांवर तर काँग्रेसने ६१ जागांवर विजय मिळाला. प्रथमच राष्ट्रवादी पक्षाने गुजरातमध्ये खाते खोलत दोन जागांवर विजय मिळविला. तर केशुभाई पटेल यांच्या पक्षाने दोन जागा जिंकल्यात. केशुभाईंनी आपला मतदार संघ सांभाळला.

Dec 20, 2012, 05:45 PM IST

मला नाकारून लोकांनी सत्य नाकारलंय- श्वेता भट्ट

मणिनगरमध्ये नरेंद्र मोदींविरोधात नेटाने उभ्या असलेल्या श्वेता भट्ट यांना पराभव पत्करावा लागला. यामुळे श्वेता भट्ट खूप दुःखी झाल्या आहेत. श्वेता भट्ट या निलंबित आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांच्या पत्नी आहेत.

Dec 20, 2012, 02:54 PM IST

गुजरातमध्ये मुख्यमंत्री नरेंद्र मोदी विजयी

गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाने निवडणूक निकालामध्ये आघाडी घेतली असताना मणिनगरमधून मुख्यमंत्री नरेंद्र मोदी विजयी झाले आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. सलग तिसऱ्यांदा मोदी विजयी झाले आहेत.

Dec 20, 2012, 11:05 AM IST

गुजरात - हिमाचल विधानसभा निवडणूक : मतमोजणीला सुरुवात

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झालीय. गुजरातच्या १८२ विधानसभा मतदारसंघात ही मतमोजणी होतेय.

Dec 20, 2012, 08:13 AM IST

गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यात ६८ टक्के मतदान

गुजरात विधानसभेच्या १८२ जागांपैकी पहिल्या टप्प्यात ८७ जागांसाठी मतदान झाले. पहिल्या टप्प्यात ६८ टक्के मतदान झाले. जास्त मतदानाचा फायदा कोणाला होणार, याची चर्चा आहे.

Dec 13, 2012, 01:58 PM IST

गुजरातमध्ये पहिल्या टप्प्याचे मतदान सुरु

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान सुरु झाले आहे. गुरुवारी सकाळी आठ वाजता कडक सुरक्षा व्यवस्थेत मतदान सुरु झाले आहे. ८७ जागांसाठी मतदान करण्यात येत आहे. यात तीन कोटी ८० लाख मतदार आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत.

Dec 13, 2012, 12:12 PM IST