गुजरात - भाजपच्या दोन जागा कमी, काँग्रेसच्या दोन वाढल्या

गुजरात विधानसभेच्या १८२ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपला ११५ जागांवर तर काँग्रेसने ६१ जागांवर विजय मिळाला. प्रथमच राष्ट्रवादी पक्षाने गुजरातमध्ये खाते खोलत दोन जागांवर विजय मिळविला. तर केशुभाई पटेल यांच्या पक्षाने दोन जागा जिंकल्यात. केशुभाईंनी आपला मतदार संघ सांभाळला.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 20, 2012, 06:45 PM IST

www.24taas.com,अहमदाबाद
गुजरात विधानसभेच्या १८२ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपला ११५ जागांवर तर काँग्रेसने ६१ जागांवर विजय मिळाला. प्रथमच राष्ट्रवादी पक्षाने गुजरातमध्ये खाते खोलत दोन जागांवर विजय मिळविला. तर केशुभाई पटेल यांच्या पक्षाने दोन जागा जिंकल्यात. केशुभाईंनी आपला मतदार संघ सांभाळला.
गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला गतवर्षी पेक्षा एक जागा कमी मिळाली तर काँग्रेसची एक वाढली. नरेंद्र मोदी यांच्या विरोधात उभ्या राहिलेल्या काँग्रेसच्या उमेदवार श्वेता भट्ट यांच्यावर मोदींनी ८६,३७३ मतांनी विजय मिळविला. मोदींनी सलग तिसऱ्यांदा विजय संपादन केला. १८२ सदस्यांच्या विधानसभेत बहुमतासाठी आवश्यक मॅजिक फिगर ही ९२ आहे. त्यामुळे भाजपकडे स्पष्ट बहुमत आहे.
गुजरातमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने पहिल्यांदा दोन जागा पटकाविल्या. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अश्वीन पटेल यांचा उमरेठ येथून विजय तर कुटीयानामधून कंदाल जडेजा यांनी बाजी मारली. तर केशुभाई पटेल यांच्या जेपीपीने दोन जागा पटकाविल्यात. तर इतर दोन जागांवर अन्य उमेदवार विजयी झालेत. ११५ जागांवर विजय मिळवणाऱ्या भाजपने स्पष्ट बहुमत मिळवत पाचव्यांदा सत्तेत येण्याचा मान पटकावला आहे.
मतमोजणीच्यावेळी भाजपच्या उमेदवारांनी सुरूवातीपासून आघाडी घेतली होती. तर काही ठिकांणी काँग्रेसच्या उमेदवारांनी भाजपच्या उमेदवारांना जोरदार टक्कर दिली. काँग्रेसचे नेते शंकर सिंह वाघेला यांनी ६५९७ मतं घेवून भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला. तर पोरबंदरमध्ये गुजरात काँग्रेस अध्यक्ष अर्जुन मोढवाडिया भाजपचे उमेदवार बाबूभाई बोखरिया यांच्याकडून १७,००० मतांनी पराभव पत्करला. तर गुजरात परिवर्तन पार्टीचे अध्यकक्ष केशुभाई पटेल हे विसावदर विधानसभा मतदार संघातून २०,००० मतांनी विजयी झालेत. तर काँग्रेसचे पहिला विजय विरामगाममधून साकार केला. काँग्रेसच्या उमेदवार डॉ. तेजश्रीबेन पटेल यांनी ११,००० मतांनी मिळविला.
विधानसभेतील विरोधी पक्षनेते काँग्रेसचे शक्तीसिंह गोहील यांचा भावनगर ग्रामीण मतदारसंघातून पराभव झाला आहे. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शंकरसिंह वाघेला हे कपडवंज मतदारसंघातून विजयी झाले आहेत. दिलीप संघानी यांना त्यांचे निकटचे काँग्रेस प्रतिस्पर्धी परेश धनानी यांनी पराभूत केलं. तसंच सिद्धपूर मतदारसंघातून आणखी एक मंत्री जयनारायण व्यास यांनाही पराभव पत्करावा लागला आहे. काँग्रेसच्या बलवंतसिंह राजपूत यांनी त्यांचा पराभव केला. एवढंच नाही तर वडगम मतदारसंघातून फकीर वाघेला यांचा काँग्रेसच्या मणिलाल वाघेला यांनी पराभव केला आहे.
टोलनाक्यावर कर्मचाऱ्याला बंदूक दाखवणाऱ्या विठ्ठल रदाडिया यांचा धोराजी मतदारसंघातून २९४३ केवळ मतांनी विजयी मिळविला. त्यांनी भाजपचे हरिलाल पटेल यांचा पराभव केला. राजकोटचे खासदार कुंवरजी बवालिया यांना बोताड मतदारसंघातून पराभव स्वीकारावा लागला. कुंवरजी बवालिया यांचा पराभव भाजपच्या ठाकरसीभाई मनिया यांनी केला. तर सुरेन्द्रनगरचे काँग्रेस खासदार सोमा पटेल मात्र लिमडी मतदारसंघात विजयी झाले आहेत.
भाजपचे गुजरात प्रदेशाध्यक्ष आर. सी. फालदू जामनगर ग्रामीण मतदारसंघातून पराभूत झाले आहेत. काँग्रेसच्या राघवजी पटेल यांनी त्यांचा पराभव केला. मोदींच्या विरोधात सद्भावना मंच स्थापन करणाऱ्या कनू कलसारिया यांचाही पराभव झाला. भाजपच्या केशुभाई नकरानी यांनी त्यांचा पराभव केला
दरम्यान, जनमत कौल चाचण्यांनी तिसऱ्यांदा मोदीच मुख्यमंत्री होतील, असं भाकीत केलं होतं ते खरं ठरलं आहे. मात्र, जनमत कौल आणि सट्टेबाज यांचा कौल मतदारांनी खोटा ठरविला. पहिल्या टप्प्यात ६८ तर दुसऱ्या टप्प्यात ७० टक्के असे विक्रमी मतदान झाले. त्यामुळे निकाल कोणाच्या बाजूने लागणार याची उत्सुकता शिगेला होती.