fulambri

'मी मराठा शेतकऱ्याच्या घरात जन्मलेला मुलगा, आरक्षण मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही'

मराठा समाजाने संयम राखावा, कायदा हाती घेऊ नये असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. मराठाच्या समाजाच्या वेदना आणि व्यथांची जाणीव मला आहे, आरक्षण मिळेपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली आहे. 

Sep 2, 2023, 07:55 PM IST

मराठा आंदोलकांवरील लाठीचार्जचे पडसाद, फुलंब्रीत सरपंचाने स्वत:ची कार जाळत सरकारला दिला इशारा

जालना बदनापूरमधील आंदोलनाला पुन्हा हिंसक वळण लागलं आहे. राज्य शासन लिहिलेली गाडी आंदोलनकर्त्यांनी पेटवली. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांचा हवेत गोळीबार केला. तर अंतरावली सराटी जाळपोळ प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले असून  लाठीचार्ज प्रकरणी शिंदे-फडणवीसांकडून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. 

Sep 2, 2023, 02:52 PM IST