farming

केरळात मान्सून दाखल, मुंबईकडे आगेकूच

नैऋत्य मोसमी पाऊस म्हणजेच मॉन्सून अखेर केरळमध्ये आज दाखल झाला आहे. तिरुअनंतपुरम आणि कोल्लम या भागामध्ये आज पहाटेपासूनच मुसळधार पाऊस होत आहे. 

Jun 5, 2015, 03:06 PM IST

काळ्या मातीच्या प्रेमात स्वित्झर्लंडवासी

काळ्या मातीच्या प्रेमात स्वित्झर्लंडवासी

Feb 4, 2015, 02:27 PM IST

शेतकऱ्यांनो पेरण्या करु नका, केंद्र सरकारची बैठक

जून बरोबरोबरच जुलै महिना देखील पावसासाठी फारसा समाधानकारक नसल्याचा अंदाज कृषी हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केलाय. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी पाऊस होत नाही तोपर्यंत पेरणी न करण्याचा सल्ला डॉ. साबळे यांनी दिलाय. त्याचप्रमाणे पावसाचा कमी झालेला कालावधी लक्षात घेऊन पीक पद्धतीमध्ये बदल करण्याची गरज डॉ. साबळे यांनी व्यक्त केलीय. 

Jun 26, 2014, 07:21 PM IST

`एल निनो`ने देशाची अर्थव्यवस्था कोसळणार

`एल निनो`ने देशात काळजीचं वातावरण तयार केलं आहे. २०१३ ते २०१४ या वर्षात `एल निनो`च्या कारणाने पावसाचे प्रमाण पाच टक्कयांनी कमी होण्याची भीती आहे. या कारणाने देशाच्या अर्थव्यवस्थेला फटका बसेल. तसेच देशाची अर्थव्यवस्था १.७५ टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावर्षी देशात पावसाचं प्रमाण कमी होईल. यामुळे अन्नधान्याच्या तुटवडा जाणवेल तसेच महागाई वाढेल. असा अंदाज `असोचेम`च्या अहवालात वर्तवण्यात आला आहे.

May 11, 2014, 06:27 PM IST

हवामान बदलाने कोकणातील आंबा, काजू पिक धोक्यात

कोकणात गेले दोन दिवस काही भागात पावसाच्या हलक्या सरींबरोबरच वातावरण ढगाळ झालं आहे. या बदललेल्या वातावरणाचा फटका हापूसला बसण्याची शक्यता आहे. सध्या आंब्याचा मोहोर तयार होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

Jan 22, 2014, 11:15 AM IST

मल्लिकाने आपल्या गावात जाऊन केली शेती

मल्लिका शेरावत एका शुटींगच्या निमित्ताने तिच्या स्वतःच्याच गावात पोहोचली. हरयाणातल्या तिच्या या गावात शुट करताना ती चक्क तिच्या पारंपरिक वेशात पाहायला मिळालीच एवढचं नाही तर तिने चक्क शेतीची कामंही केली.

Oct 9, 2013, 08:41 PM IST

नाशिकमध्ये गारांचा पाऊस, पिकांचं नुकसान

राज्यात विविध ठिकाणी अचानक पावसानं दमदार हजेरी लावली आहे. नाशिकमध्ये गारांचा पाऊस पडला आहे. तर कर्जत, खालापूर आणि लोणावळ्यातही सरी बरसल्या आहेत.

Feb 11, 2013, 09:47 PM IST

गुडबाय २०१२- पीकपाणी

सिंचन घोटाळ्यात श्वेत पत्रिका, काळी पत्रिका आणि सत्य पत्रिका सादर करण्यात आली. मात्र सगळ्याच सत्ताधा-यांनी जबाबदारी झटकत राजकारणात रंग भरले. मात्र सत्ताधा-यांच्या फक्त बैठका आणि चर्चासत्रांचे पीक आलंय. यावर्षी अशा प्रश्न निकालात काढून कृती करण्या ऐवजी वेळ मारुन नेण्याचेच प्रकार या वर्षी दिसून आलेत

Dec 24, 2012, 11:11 PM IST

टरबुजांमधून२.५ लाखांचं उत्पन्न

बुलढाणा जिल्ह्यातील विठ्ठल शिंदे या शेतक-यानं एका एकरावर टरबूजची लागवड केली. सध्या बाजारात टरबूज नसल्याने त्यांच्या टरबूजांना चांगला भाव मिळून त्यांना अडीच लाख रुपये उत्पन्न होण्याची अपेक्षा आहे.

Aug 29, 2012, 01:23 PM IST

शेतकऱ्यांना फायदा देणारं 'स्वीट कॉर्न'

सांगली जिल्ह्यतल्या मिरज पुर्व आरग गावातील बाबासो पाटील या शेतक-यानं दुष्काळावर मात करीत स्वीटकॉर्नची लागवड केली. हे पीक अवघे तीन महिन्यात जास्तीत जास्त उत्पन्न देतं आणि जनावरांसाठी वैरण ही भरपूर तयार होते.

Aug 2, 2012, 10:43 AM IST