लातूर: सरणावर चढून संपातील शेतकऱ्याचे आंदोलन
रेणापूर तालुक्यातील संपूर्ण खलंग्री गावाने शेतकऱ्यांच्या या संपाला ग्रामसभा घेऊन पाठिंबा दर्शविला आहे. यावेळी गावातील बहुतांश शेतकरी उपस्थित होते.
Jun 2, 2018, 01:32 PM ISTशेतकरी संपाचा आज दुसरा दिवस; रस्त्यावर दूध ओतून सरकारचा निषेध
शिर्डीत पुणे-नाशिक महामार्गावर दुधाचा टँकर रिकामा करण्यात आला. संगमनेर तालुक्यात शेतकऱ्यांनी सरकारी धोरणाचा तीव्र निषेध केला.
Jun 2, 2018, 08:30 AM ISTऐतिहासिक शेतकरी संपाची आज वर्षपूर्ती, शेतकऱ्यांना काय मिळालं?
अहमदनगर जिल्ह्यातल्या पुणतांब्यात गेल्या वर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शेतकऱ्यांनी धरणं आंदोलन केलं होतं. त्या ऐतिहासिक संपाला आज एक वर्ष पूर्ण झालं.
Jun 1, 2018, 08:44 AM IST3 महिन्यापासून शेतकऱ्यांना बिलाच्या पहिल्या हप्त्याची प्रतिक्षा
3 महिन्यापासून शेतकऱ्यांना बिलाच्या पहिल्या हप्त्याची प्रतिक्षा
May 22, 2018, 07:57 PM ISTशेतकरी संप : सांगलीत टाळेबंदी, पुणतांबा येथे सरकारचे दहावे
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारतीच्या गेटला शेतकरी आंदोलन कर्त्यांनी टाळे ठोकले. तर अहमदनगरमधील पुणतांबा येथे सरकारचे दहावे घालण्यात आले. अमरावतीत भाजीपाला फेकण्यात आला.
Jun 6, 2017, 11:53 AM ISTपुणे, वाशी मार्केटमध्ये आवक सुरु, पुणतांबा येथील शेतकरी आक्रमक
पुणे मार्केट यार्डातील परीस्थिती आज काहीशी सुधारली आहे. पुण्यात आज 657 गाड्या शेतमालाची आवक झाली. तर वाशी एपीएमसी मार्केटमध्ये आजही भाजीपाल्याची आवक सामन्यपणे सुरू आहे. आज सकाळपासून वाशीत 320 गाड्यांची आवक झाली.
Jun 6, 2017, 09:59 AM ISTनाशिक जिल्ह्यात संप सुरुच राहणार, सर्वच राजकीय पक्ष मैदानात
जिल्ह्यातील किसान क्रांती आंदोलनाच्या बैठकीत आता सर्वच राजकीय पक्ष मैदानात आले आहेत. काँग्रेसच्या प्रवक्त्या हेमलता पाटील, राष्ट्रवादीच्या अमृता पवार आणि मकपाचे आमदार ही यात सक्रियपणे नेतृत्व करू लागले आहेत. आंदोलन अधिक बळकट करण्यासाठी उद्या शेतकऱ्यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आले आहे.
Jun 3, 2017, 02:40 PM ISTशेतकऱ्यांच्या संपाबाबत गोंधळ, कुठे आनंदोत्सव तर कुठे रास्ता रोको सुरूच
मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांनी संप मागे घेतल्याचं जाहीर केलं. परंतु, मुख्यमंत्र्यांची भेट घेणाऱ्या या शेतकऱ्यांचा निर्णय राज्यातील इतर शेतकरी संघटनांना मात्र मान्य नसल्याचं दिसतंय.
Jun 3, 2017, 12:05 PM ISTशेतकऱ्यांनो संयम बाळगा : दीपक केसरकर
शेतकऱ्यांनी केलेल्या संपानंतर अर्थराज्य मंत्री आणि गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी शेतकऱ्यांना संयम बाळगण्याचा सल्ला दिलाय.
Jun 2, 2017, 10:36 PM ISTशेतकरी संपाला राज ठाकरेंचा पाठिंबा, भाजप सरकारने बनवले!
शेतकरी संपाला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही पाठिंबा दिला आहे. शेतकरी संपावरून राज ठाकरेंनी भाजप सरकारवर जोरदार केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने शेतकऱ्यांची साफ निराशा करुन फसवणूक केल्याचे राज म्हणालेत.
Jun 2, 2017, 07:02 PM ISTशेतकरी संतापला, ५ जूनला महाराष्ट्र बंदची हाक
शेतीमालाला हमीभाव आणि संपूर्ण कर्जमुक्तीबाबत सरकार ठोस निर्णय घेत नसल्याने शेतकऱ्यांनी संपाचा लढा तिव्र करण्याचा इशारा दिलाय. ५ जूनला महाराष्ट्र बंदची हाक दिलेय.
Jun 2, 2017, 06:43 PM ISTशेतकरी संपाला औरंगाबादमध्ये हिंसक वळण
शेतकरी संपाला आज सकाळी औरंगाबादमध्ये हिंसक वळण लागलं. औरंगाबादच्या जाधववाडी मार्केटमध्ये शेतकरी नेते जयाजीराव सूर्यवंशी यांच्या नेतृत्त्वाखाली शंभराहून अधिक शेतकरी बाजार बंद करण्याचे आवाहन करीत होते. त्याच दरम्यान एका ट्रकची हवा सोडत असताना व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन शेतकऱ्यावर हल्ला केला. यात जयाजीराव सूर्यवंशीसह ५ शेतकऱ्यांना मारहाण केली.
Jun 1, 2017, 04:55 PM ISTशेतकरी संप : साताऱ्यात दूध डेअरीच्या ट्रकची तोडफोड
शेतकरी संपाची पहिली ठिणगी सातारा जिल्ह्यात पडलीय. साताऱ्यात शेतकरी संघटनेनं कोल्हापूरहून मुंबईला जाणारी दूध वाहतूक रोखून ट्रकची तोडफोड केली.
Jun 1, 2017, 08:34 AM ISTशेतकरी १ जूनपासून संपावर, किसान क्रांती संघटनेची घोषणा
राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमुक्ती आणि शेतीमालाच्या हमीभावासाठी येत्या १ जूनपासून शेतकरी संपावर जाणार असल्याची घोषणा किसान क्रांती या शेतकऱ्यांच्या संघटनेने केली आहे.
May 24, 2017, 06:13 PM ISTएक जूनपासून शेतकरी संपावर
एक जूनपासून शेतकरी संपावर जाणार आहेत... त्यासंदर्भातील रणनिती पुणतांब्यामधील किसान क्रांती समन्वय समितीच्या बैठकीत जाहीर करण्यात आली.
May 22, 2017, 05:09 PM IST