नितीन गडकरींची पुणे नगर नियोजन विभागावर जोरदार टीका
शहराचे नियोजन करण्यासाठी वीस वर्ष लावणारा नगर नियोजन विभाग हा होपलेस आहे, अशी भुक्कड संस्था मी पाहिली नाही, अशा शब्दात केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नगर नियोजन विभागावर जोरदार टीका केली आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्द प्राधिकरणाच्या वतीने चांदणी चौकातील उड्डाण पुलासह पुणे जिल्ह्यातील १६ हजार ४३० कोटी रुपयांच्या रस्त्याच्या कामाचे नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
Aug 27, 2017, 01:58 PM ISTगोरक्षकांच्या मुद्द्यावरुन औवैसींची आरएसएस आणि सरकारवर टीका
औरंगाबाद : गोरक्षकांकडून देशभरात विविध ठिकाणी हत्या करण्यात आल्या. त्यामागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नियोजन असल्याचे आरोप एमआयएमचे अध्यक्ष खासदार असुदुद्दीन औवेसी यांनी केला. यासाठी शनिवारी त्यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबादच्या मौलाना आझाद चौक ते भडकल गेटपर्यंत खामोश मोर्चा काढण्यात आला.
Jul 23, 2017, 12:23 PM ISTविजय शिवतारेंची अजित पवारांवर सडकून टीका
एकीकडे शेतकऱ्यांची कर्जमाफी फसवी आहे अशी शिवसेना दूतोंडी मांडूळ आहे असे आरोप राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केले होते. त्याच आरोपांना उत्तर देतांना बारामतीत जलसंपदा मंत्री विजय शिवतारे यांनी भ्रष्टाचाराचा अजगर कोण आहे, हे महाराष्ट्रातील जनतेला माहिती असून या अजगरामुळेच पूर्ण शेतकऱ्यांची अडचण झाली असल्याचा आरोप करत अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली आहे.
Jul 10, 2017, 09:34 AM IST...या व्हॉटसअप मॅसेजमुळे स्वाती साठे गोत्यात!
मंजुळा शेट्ये हत्या प्रकरणात कारागृह उपपोलीस महानिरीक्षक स्वाती साठे या अडचणीत येण्याची शक्यता आहे. मंजूला शेट्ये मारहाण आणि हत्या प्रकरणाची कारागृह प्रशासनातर्फे स्वाती साठे चौकशी करतायत. कारागृह प्रशासनाच्या व्हॉट्सप ग्रुपवर केलेल्या एका मेसेजमुळे स्वाती साठे चांगल्याच अडचणीत येऊ शकतात.
Jul 7, 2017, 09:21 PM IST'सामना'मधून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारवर टीकास्त्र
गेल्या ६ दिवसांपासून राज्यात शेतकऱ्यांचा संप सुरु आहे. शेतकऱ्यांनी सरकारविरोधात पुकारलेल्या बंदला राज्यभरातून प्रतिसाद मिळत आहे. पण शेतकऱ्यांच्या संपाचा आक्रोश सरकारपर्यंत पोहोचला आहे का?, असा प्रश्न शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या संपादकीयमधून सरकारला केला आहे.
Jun 6, 2017, 12:23 PM IST'आप'ने भ्रष्टाचाराचा केल्याचा कपिल मिश्रांचा आरोप
आपमधून हकालपट्टी झालेले आणि दिल्ली सरकारमधले माजी मंत्री कपिल मिश्रा यांनी पुन्हा अरविंद केजरीवाल यांच्यावर आरोपांची फैर झाडली. मोहल्ला क्लिनिक प्रकरणात आपने भ्रष्टाचार केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसंच पार्टी फंडमध्येही प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचा मिश्रा यांचा आरोप आहे.
May 14, 2017, 12:49 PM ISTजस्टीन बीबरच्या शोसाठी सेलिब्रिटींची गर्दी, आयोजकांवर तूफान तोंडसुख
सोशल मीडियात आयोजकांवर तूफान तोंडसुख
May 11, 2017, 08:33 AM ISTमस्जिदीवरील भोंग्यावर संतापला सोनू निगम
बॉलिवूडचा गायक सोनू निगमने एक ट्विट केलं आहे ज्यानंतर सोशल मीडियावर चर्चा सुरु झाल्या आहेत. सोमवारी सकाळी मस्जिदवरील भोंग्याबाबत त्यांने एक ट्विट केलं. रोज सकाळी मोठ्या आवाजात मस्जिदमध्ये अझान दिली जाते.
Apr 17, 2017, 11:06 AM ISTगोमांसच्या मुद्द्यावर ओवैसींची भाजपवर टीका
उत्तर प्रदेशमध्ये अवैध कत्तलखाने बंद करण्यात येत आहे. राज्यात सुरु असलेल्या या कारवाईमुळे वाद निर्माण झाला आहे. याला राजकीय रंग दिला जात आहे. खासदार असदुद्दीन ओवैसींनी या मुद्द्यावर भाजपवर टीका केली आहे.
Apr 1, 2017, 05:49 PM ISTमुलायम सिंह यांचा मुलगा अखिलेशवर हल्लाबोल
उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाला मोठा पराभव स्विकारावा लागला. समाजवादी पक्षाचे संरक्षक, संस्थापक आणि माजी अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांनी सपाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यावर मोठा हल्लाबोल केला आहे.
Apr 1, 2017, 04:20 PM ISTभारतीय नागरिकाच्या हत्येवरुन हिलेरी यांची ट्रम्प यांच्यावर टीका
अमेरिकेत झालेल्या भारतीय इंजिनियरच्या हत्याच्या प्रकरणात हिलेरी क्लिंटन यांनी ट्रम्प यांच्यावर टीका केली आहे. हिलेरीने ट्विट करत ट्रम्प यांना यावर बोलण्याची आणि त्यांची बाजू मांडण्यासाठी सांगितलं आहे.
Feb 28, 2017, 09:47 AM ISTसोमय्या बिल्डर्सचे दलाल - खासदार राहुल शेवाळे
पारदर्शकतेच्या मुद्यावरून शिवसेना-भाजपचा सुरू झालेला संघर्ष आता टोकाला पोहचलाय. पारदर्शकतेच्या मुद्द्यावर भाजप खासदार किरीट सोमय्यांनी उद्धव ठाकरेंना पुन्हा लक्ष्य केलंय.
Feb 13, 2017, 10:27 PM ISTराज्यसभेत पंतप्रधानांनी केले आक्षेपार्ह वक्तव्य...
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर निवेदन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळं मोठा वाद निर्माण झाला. त्यामुळं काँग्रेसच्या संतप्त खासदारांनी राज्यसभेतून सभात्याग केला.
Feb 8, 2017, 07:14 PM ISTगुरुदास कामत यांचं संजय निरुपम यांच्यावर टीकास्त्र
काँग्रेसचे माजी खासदार गुरुदास कामत यांनी आज पुन्हा एकदा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. निरुपम आणि महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश यांना कंटाळून काँग्रेसचे दुसऱ्या फळीचे नेते पक्षाला रामराम ठोकत आहेत. त्याबद्दल राहुल गांधीं आणि अहमद पटेल यांनी लक्ष घालावे, असं साकडं कामत यांनी ट्विटरवर घातलं आहे.
Jan 23, 2017, 06:02 PM ISTभाजपच्या पारदर्शी अंजेड्यावर शिवसेनेचा पलटवार
राज्यात आणि केंद्रात पारदर्शी कारभार करा
Jan 17, 2017, 04:12 PM IST