राज्यसभेत पंतप्रधानांनी केले आक्षेपार्ह वक्तव्य...

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर निवेदन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळं मोठा वाद निर्माण झाला. त्यामुळं काँग्रेसच्या संतप्त खासदारांनी राज्यसभेतून सभात्याग केला. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Feb 8, 2017, 07:14 PM IST
राज्यसभेत पंतप्रधानांनी केले आक्षेपार्ह वक्तव्य... title=

नवी दिल्ली : राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर निवेदन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळं मोठा वाद निर्माण झाला. त्यामुळं काँग्रेसच्या संतप्त खासदारांनी राज्यसभेतून सभात्याग केला. 

देशाच्या सत्तर वर्षांच्या राजकारणात डॉ. मनमोहन सिंग यांचा निम्मे काळ आर्थिक धोरणांवर दबदबा राहिला. मात्र त्यांनी भ्रष्टाचाराचा एकही डाग लागू दिला नसल्याचं सांगत रेनकोट घालून अंघोळ करणं मनमोहन सिंगांकडून शिकाव असा टोला मोदींनी लगावला. 

काँग्रेसनं मात्र मोदींनी माफी मागितल्याशिवाय सभागृहाचं कामकाज चालू देणार नसल्याचा इशारा दिलाय.