नवी दिल्ली : अमेरिकेत झालेल्या भारतीय इंजिनियरच्या हत्याच्या प्रकरणात हिलेरी क्लिंटन यांनी ट्रम्प यांच्यावर टीका केली आहे. हिलेरीने ट्विट करत ट्रम्प यांना यावर बोलण्याची आणि त्यांची बाजू मांडण्यासाठी सांगितलं आहे.
वर्णभेदावरुन भारतीय नागरिक श्रीनिवास कुचिभोटला यांच्या हत्येचा जगभरातून विरोध होत आहे. हिलेरी यांनी ट्विट करत म्हटलं की, 'धमकी आणि नफरत से भरे अपराधों की संख्या में लगातार इजाफा हो रहा है। हमें राष्ट्रपति को उनका काम बताने की जरूरत नहीं है। ट्रंप को आगे बढ़कर खुद इस पर जवाब देना चाहिए।
धमकी आणि द्वेष यामुळे मोठ्या प्रमाणात होणाऱ्या गुन्ह्यांची संख्या वाढत आहे. आम्हाला राष्ट्राध्यक्षांना त्यांचं काम सांगण्याची गरज नाही. त्यांनी स्वत: पुढे येऊन यावर उत्तर दिलं पाहिजे.