congress party

पंजाबमध्ये आज बनणार काँग्रेस सरकार, सिद्धूवर सर्वांचं लक्ष

पंजाबमध्ये चांगलं यश मिळवणाऱ्या काँग्रेस पक्षाकडून आज कॅप्टन अमरिंदर सिंह सकाळी १० वाजता मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे. त्यांच्यासोबत आणखी ११ मंत्री शपथ घेणार आहेत. ज्यामध्ये नवज्योत सिंग सिद्धू, मनप्रीत बादल, ब्रह्म महिंद्रा, साधू सिंग धर्मसोत, राणा गुरजीत सिंग, तृप्त राजेंद्र बाजवा आणि चरणजीत सिंग चन्नी कॅबिनेटमंत्री पदाची तर रजिया सुल्ताना, अरुणा चौधरी आणि ओपी सोनी हे राज्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे.

Mar 16, 2017, 08:40 AM IST

इंदिरा गांधी असत्या तर मी काँग्रेसमध्ये असतो - शत्रुघ्न सिन्हा

भाजप नेता आणि अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचं कौतूक केलं आहे. शत्रुघ्न सिन्हा यांनी त्यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी पत्रकारांसोबत बोलतांना हे वक्तव्य केलं. शत्रुघ्न सिन्हा यांनी सांगितलं की इंदिरा गांधी त्यांना खूप मानायच्या.

Oct 6, 2016, 12:30 PM IST

काँग्रेसमध्ये तिकीटासाठी बनवावे लैंगिक संबंध-आरोप

माजी काँग्रेस नेता चेरियन फिलिप यांनी रविवारी काँग्रेस पक्षावर गंभीर आरोप केले, महिलांना काँग्रेसमध्ये तिकिट मिळवण्यासाठी लैंगिक संबंध ठेवावे लागतात, असा गंभीर आरोप फिलिप यांनी केला आहे.

Oct 19, 2015, 09:54 AM IST

काँग्रेसनंतर राष्ट्रवादी, शिवसेनेचा आजपासून विधानसभेचा प्रचार

निवडणुकीची तारीख जाहीर होण्यापूर्वीच काँग्रेसने प्रचाराचा शुभारंभ केल्यानंतर आता राष्ट्रवादी कांग्रेसही आज प्रचाराचा नारळ फोडणार आहे. तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज नांदेडमध्ये प्रचाराला सुरुवात करणार आहेत.

Sep 6, 2014, 08:51 AM IST

नारायण राणे नाराज, बंडाच्या पावित्र्यात

 काँग्रेसमध्ये अस्वस्थ असलेले उद्योगमंत्री नारायण राणे बंडाच्या पवित्र्यात असल्याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. उद्यापासून राणेंचा ३ दिवसांचा कोकण दौरा सुरू होत आहे. 

Jul 17, 2014, 01:29 PM IST

बाहेर पडणार नाही, सरकार पाडणार नाही- ममता

केंद्रातील यूपीए सरकारमधून बाहेर पडणार नाही किंवा सरकार पाडणार नाही, असे तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केले आहे. राष्ट्रपती निवडणुकीबाबत समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांच्याशी भेट करण्यापूर्वी ममतांनी हे स्पष्ट केले आहे.

Jun 14, 2012, 08:08 PM IST

ममतांनी घेतले सोनियांना शिंगावर!

माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलामच राष्ट्रपतीपदाचे क्रमांक एकचे उमेदवार आहेत. आमचे उमेदवार कलाम आहे. यावर सर्वांनी एकमत करावे, असे सांगून तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींना शिंगावर घेतले आहे.

Jun 14, 2012, 08:07 PM IST

सगळ्यांचा बरोबर हिशोब होणार- सोनिया गांधी

देशातल्या विधानसभा निवडणुकीतल्या अपयशाच्या पार्श्वभूमीवर सोनिया गांधींनी काँग्रेस नेत्यांची चांगलीच झाडाझडती घेतली. काँग्रेस खासदारांच्या बैठकीत सोनियांनी नेत्य़ांना खडे बोल सुनावले.

May 9, 2012, 02:18 PM IST