पंजाबमध्ये आज बनणार काँग्रेस सरकार, सिद्धूवर सर्वांचं लक्ष

पंजाबमध्ये चांगलं यश मिळवणाऱ्या काँग्रेस पक्षाकडून आज कॅप्टन अमरिंदर सिंह सकाळी १० वाजता मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे. त्यांच्यासोबत आणखी ११ मंत्री शपथ घेणार आहेत. ज्यामध्ये नवज्योत सिंग सिद्धू, मनप्रीत बादल, ब्रह्म महिंद्रा, साधू सिंग धर्मसोत, राणा गुरजीत सिंग, तृप्त राजेंद्र बाजवा आणि चरणजीत सिंग चन्नी कॅबिनेटमंत्री पदाची तर रजिया सुल्ताना, अरुणा चौधरी आणि ओपी सोनी हे राज्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे.

Updated: Mar 16, 2017, 08:40 AM IST
पंजाबमध्ये आज बनणार काँग्रेस सरकार, सिद्धूवर सर्वांचं लक्ष title=

चंडीगड : पंजाबमध्ये चांगलं यश मिळवणाऱ्या काँग्रेस पक्षाकडून आज कॅप्टन अमरिंदर सिंह सकाळी १० वाजता मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे. त्यांच्यासोबत आणखी ११ मंत्री शपथ घेणार आहेत. ज्यामध्ये नवज्योत सिंग सिद्धू, मनप्रीत बादल, ब्रह्म महिंद्रा, साधू सिंग धर्मसोत, राणा गुरजीत सिंग, तृप्त राजेंद्र बाजवा आणि चरणजीत सिंग चन्नी कॅबिनेटमंत्री पदाची तर रजिया सुल्ताना, अरुणा चौधरी आणि ओपी सोनी हे राज्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे.

पंजाब विधानसभेत काँग्रेसचे ७७ आमदार आहेत. त्यामुळे राज्यात ते १८ मंत्री बनवू शकतात. पण सर्वांची नजर नवज्योत सिंग सिंद्धू यांच्यावर असणार आहे. सिद्धूची उपमुख्यमंत्रीपदी वर्णी लागू शकते. शपथ ग्रहणाचा कार्यक्रम हा अतिशय साधा असणार आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग यांची आई रुग्णालयात आहे. पण शपथ ग्रहण कार्यक्रमात काँग्रेस शासित राज्यांचे ६ मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहे. या शिवाय राहुल गांधी आणि काँग्रेसचे काही मोठे नेते देखील सहभागी होणार आहेत.

मनमोहन सिंग, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंग, नॅशनल कांफ्रेंसचे नेता फारूक अब्दुल्ला त्यांचे पुत्र उमर अब्दुल्ला, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव हे देखील या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहे. पी चिदंबरम, आनंद शर्मा, कपिल सिब्बल, अश्वनी कुमार, राजीव शुक्ला, हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंह हुड्डा, राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह हे देखील उपस्थित राहणार आहे.

पंजाब विधानसभेत १७७ पैकी काँग्रेसला ७७, अकाली दल आणि भाजपला १८ तर आपला २० जागा मिळाल्या आहेत. २ जागा लोक इंसाफ पक्षाला मिळाल्या आहेत. अमरिंदर सिंग हे २००२ ते २००७ पर्यंक पंजाब राज्याचे मुख्यमंत्री होते.