chief minister

`अजितदादांनीच व्हावं मुख्यमंत्री!`

राष्ट्रवादी काँग्रेसकडून 145 जागांवर दावा ठोकणा-या वसंत वाणींना शरद पवारांनी समज दिल्यानंतर त्यांनी आपल्या तलवारी म्यान केल्यात. पण तरीही दादांनी मुख्यमंत्री व्हावं हा आपला आग्रह मात्र त्यांनी कायम ठेवलाय.

Mar 11, 2013, 06:51 PM IST

CM पदावरून राष्ट्रवादीला चव्हाणांचा टोला

राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये CM पदावरून वाकयुद्ध सुरु झाले आहे. माणिकराव ठाकरेंनंतर आता माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी राष्ट्रवादीला टोला हाणला, आधी निवडणुका होऊ द्या, मग बोला. कोणी मुख्यमंत्री व्हायचे ते मतदानानंतर ठरवू.

Mar 5, 2013, 04:44 PM IST

राज्यात मराठी भाषा भवन – मुख्यमंत्री

राज्याची भाषा मराठी आहे. या माय मराठीसाठी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त व्हावा यासाठी अहवाल तयार करण्यात आला आहे. त्याचबरोबर मराठी भाषा भवनाची लवकरच निर्मिती केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज केली.

Feb 28, 2013, 07:21 PM IST

अजित दादांच्या बालेकिल्ल्यात मुख्यमंत्र्यांना आमंत्रण!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पिंपरी-चिंचवड या बालेकिल्ल्यात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण विकास कामांच्या उद्घाटनाला येणार आहेत. तेही खुद्द अजित पवार यांच्या सांगण्यावरून....

Jan 9, 2013, 09:21 PM IST

मुख्यमंत्र्यांचे मंत्रिमंडळ विस्ताराचे संकेत

केंद्रीय मंत्रीमंडळात फेरबदल झाल्यानंतर राज्यातही मंत्रिमंडळ विस्ताराचे संकेत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले होते. त्यापार्श्वभूमीवर दिल्लीत काँग्रेस नेत्यांनी मंत्रीपदासाठी जोरदार लॉबिंग सुरू केलंय.

Oct 30, 2012, 10:27 PM IST

महिला सीएमचे मनावर घेऊन नका - शरद पवार

महिला मुख्यमंत्रीपदाचं गांभिर्याने घेऊ नका, असा सल्ला माध्यमांना दिलाय तो राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी. कालच गोंदियात याबाबत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी वक्तव्य केलं होतं.

Oct 14, 2012, 08:07 PM IST

जलसंपदा विभागातल्या ४५ अधिकाऱ्यांची चौकशी!

सिंचन घोटाळा प्रकरणी जलसंपदा विभागातल्या 45 अधिका-यांची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत. विरोधी पक्ष मात्र श्वेतपत्रिकेच्या मागणीवर ठाम आहेत. सिंचन प्रकल्पांच्या किंमती वाढण्यामागे नियम डावलले गेल्याचा आरोप भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. तर काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी राष्ट्रवादीवर अप्रत्यक्ष टीका केलीये.

Oct 7, 2012, 08:05 PM IST

संस्था- बिल्डर्सच्या वादात खडसेंची उडी

ठाण्यातील श्रीष गृहनिर्माण संस्थेतील काही बंगल्यांच्या पुनर्बांधणीच्या कामावरुन संस्था आणि बिल्डर यांच्यात वाद सुरु आहे. या वादात विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्या आग्रहावरुन मुख्यमंत्र्यांनी पुनर्बाँधणीच्या कामाला स्थगिती आदेश दिलाय.

May 18, 2012, 01:48 PM IST

दुष्काळासाठी आम्ही काहीच करत नाही- पतंगराव

दुष्काळावरुन रान पेटलेलं असताना आणि सिंचनावरुन काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये जुंपली असतानाच पतंगरावांनी सरकारला घरचा आहेर दिलाय. दुष्काळासाठी आम्ही कायमस्वरुपी काहीच करत नाही, चर्चा खूप होते पण प्रत्यक्षात आम्ही ठोस निर्णयच घेत नाही, असं मदत आणि पुनर्वसन मंत्री खुद्द पतंगराव कदमांनीच म्हटलंय.

May 5, 2012, 09:18 PM IST

आज प्रचार तोफा थंडावणार

पालिका निवडणुकांचा प्रचार आता शिगेला पोचला आहे. आज संध्याकाळी प्रचाराची मुदत संपणार असल्यानं सर्वच पक्षांच्या उमेदवारांसह अपक्षांनीही जोरदार प्रचार सुरू केला आहे. शेवटच्या दिवशी जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोचता यावं यासाठी ‘रोड शो’वर उमेदवारांनी भर दिला आहे.

Feb 14, 2012, 03:50 PM IST

मुंबई उपनगरांसाठी जादा .३३ एफएसआय

दोन वर्षांपासून रखडलेला मुंबई उपनगरांसाठी जादा .३३ एफएसआय देण्याचा निर्णय राज्य सरकारने अखेर घेतला.

Nov 5, 2011, 01:25 PM IST