उल्हासनगरमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळल्याने आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू
उल्हासनगरमध्ये चार मजली इमारतीचा स्लॅब कोसळला आहे. या अपघातात आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. साई सिद्धी बिल्डिंगमधील चौथ्या मजल्यावरून स्लॅब थेट तळ मजल्यावर कोसळला. या इमारतीमधील आणखी 3 ते 4 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ठाणे महानगरपालिकेची टीडीआरएफ टीम निघाली आहे. अग्निशमन विभागाची टीम घटनास्थळी उपस्थित आहे.
May 29, 2021, 12:59 AM ISTडोंबिवलीमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू
डोंबिवलीमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळला, एकाचा मृत्यू
Aug 7, 2019, 09:00 PM IST