मी आंत्रप्रेन्युअर !
अपुर्वा नेमळेकर
एकदा एका प्रेफेसरांनी मला विचारलं, की तुला आयुष्यात नक्की काय करायचंय? मी उत्तर दिलं,“ नक्की माहीत नाही. पण, मिळालेली कुठलीच संधी सोडणार नाही. जे समोर येईल ते करणार.” आयुष्य प्लॅन करण्यापेक्षा येणारी संधी स्वीकारण्याचा माझा स्वभावच मला इथपर्यंत घेऊन आला.