स्वतंत्रता दिवस

सरसंघचालक म्हणाले- बांगलादेशात हिंदू तणावात; त्यांची सुरक्षा सरकारची जबाबदारी!

Mohan Bhagwat on Bangladesh Hindu: बांगलादेशातील हिंदूंवर होत असल्याने भागवतांनी खंत व्यक्त केली.

Aug 15, 2024, 11:32 AM IST

नोटबंदीमुळे व्याजदर घटले, कर्जं स्वस्त झाली: नरेद्र मोदी

७१व्या स्वातंत्र्यदिनी राजधानी दिल्लीत लाल किल्यावरून भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीचा देशाला झालेला फायदा सांगितला. मोदी म्हणाले नोटबंदीमुळे बॅंकांकडे मोठ्या प्रमाणात पैसा आला. ज्यामुळे कर्जांवरील व्याजदर घटले आणि कर्जे स्वस्त झाली.

Aug 15, 2017, 07:10 PM IST

महाराष्ट्रात उत्साहपूर्ण वातावरणात साजरा झाला स्वातंत्र दिन !

 आपला स्वातंत्रदिन महाराष्ट्रात मंगळवारी अत्यंत जोश आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा केला गेला. मुंबई आणि कोकणातील काही भागात झालेल्या पर्जन्यवृष्टीमुळे कार्यक्रमात काही अडचणी आल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या निवासस्थानी आणि मंत्रालयात ध्वजारोहण केले. राजभवनातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, महाराष्ट्र आणि तामिळनाडूचे राज्यपाल सी.वी. राव या खास दिवशी चैन्नईत असतील आणि स्वातंत्रदिनानिमित्त आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील. 

Aug 15, 2017, 02:22 PM IST

राष्ट्रपतींकडून ११२ वीरता पुरस्कारांची घोषणा

सेना आणि अर्धसैनिक दलाच्या ११२ जणांना यावर्षी वीरता पुरस्कारांसाठी निवडलं गेलं आहे. ७१व्या स्वतंत्रता दिवसाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या पुरस्कारांची घोषणा केली. सेनेच्या दोन जवानांना आणि सीआरपीएफच्या एका कमांडंटला मरणोत्तर किर्ती चक्र पुरस्कारासाठी निवडलं गेलं आहे. यावर्षी किर्ती चक्र पुरस्कारांसाठी पाच जवानांना निवडलं गेलं आहे. 

Aug 15, 2017, 08:27 AM IST

नवीन भारतात जातीयवाद, धर्मांधतेला स्थान नसणार - मोदी

नवीन भारताचा संकल्प २०२२ पर्यंत पूर्ण करायचा आहे. देशाच्या विकास यात्रेत सहभागी व्हा, असे आवाहन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणातून केले. आज भारताचा ७०वा स्वातंत्र्य दिन देशभरात साजरा केला जात आहे. 

Aug 15, 2017, 08:02 AM IST