धक्कादायक: रुग्णाला ‘ए’+ ऐवजी दिलं ‘ए’ निगेटिव्ह रक्त
एका रुग्णाला ‘ए’ पॉझिटिव्हऐवजी ‘ए’ निगेटिव्ह रक्त दिल्याची घटना ठाण्यातल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घडलीय. ठाण्यातल्या वाडा इथं सोनू पांडे नावाचा मुलगा गेल्या १० वर्षापासून भिवंडी सुधारगृहात राहतो. काही दिवसांपूर्वी त्याच्या पोटात दुखू लागल्यानं ठाण्यातल्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तपासणीत सोनूच्या पोटातील आतड्यांना गँगरींग झाल्याचं समजलं. त्यामुळं त्याचं ऑपरेशन करावं लागलं.
Dec 21, 2013, 01:41 PM ISTसिव्हिल हॉस्पिटल की मृत्यूचं दार?
ठाण्यातलं सिव्हील हॉस्पीटल नवजात बालकांसाठी मृत्यूचे दार ठरत असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. गेल्या सात महिन्यांत या हॉस्पीटलमध्ये तब्बल 78 बालकांचा मृत्यू झालाय.
Aug 19, 2012, 12:33 PM IST२०० रूपयांसाठी मुलीचा गेला जीव
देशातील आरोग्य यंत्रणेचा पुन्हा एकदा बोजवारा उघड झाला आहे. केवळ २०० रूपये नसल्याने आईवडिलांना आपल्या सहा महिन्यांच्या मुलीला गमवावे लागले आहे. ही घटना घडली आहे पंजाबमध्ये. सहा दिवसांच्या मुलीवर उपचार करण्यासाठी २०० रूपयांची गरज होती.
Jul 26, 2012, 02:19 PM IST