सभा

राहुल गांधींचा रोड शो, विरोधकांची टीका!

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यानंतर आज राहुल गांधी वाराणसीत भव्य रोड शो केला. काँग्रेस उमेदवार अजय राय यांच्या प्रचारासाठी राहुल गांधी आज शेवटच्या दिवशी वाराणसीत आले आहेत आणि याठिकाणी ते शक्तिप्रदर्शन करतायत. राहुल गांधींच्या आजच्या रोड शो आणि सभेसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केलीय.

May 10, 2014, 02:42 PM IST

मोदींच्या सभेसाठी वाराणसीत मैदान नाही, परवानगी नाकारली

देशात आज आठव्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. १२ तारखेला मतदानाचा अखेरचा टप्पा पार पडेल. तेव्हा नरेंद्र मोदींच्या वाराणसी इथंही मतदान होणार आहे. त्या अगोदर उद्या नरेंद्र मोदी वाराणसीत सभा घेणार आहेत. मात्र ही सभा आता परवानगीच्या कचाट्यात सापडली आहे.

May 7, 2014, 02:59 PM IST

चाहत्याने केला सवाल, राहुल भैया तुम्ही लग्न कधी करणार

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींना लग्न करण्यासाठी त्यांच्याच पक्षाचे कार्यकर्ते आता प्रश्न विचारू लागले आहेत. असाच एक किस्सा अलाहाबादच्या एका सभेत घडला आहे. राहुल यांच्या एका चाहत्याने राहुल यांना सभेतच लग्नाचा प्रश्न विचारला. या प्रकाराचा राहुल यांनी हसत हसतच समाचार घेतला.

May 6, 2014, 11:22 AM IST

पराभव झाला तर पुन्हा चहा विकेन - नरेंद्र मोदी

नरेंद्र मोदींची अमेठीत जाहीर सभा

May 5, 2014, 04:43 PM IST

मोदींना `हिटलर` म्हणणाऱ्या चिरंजीवीवर अंड्यांचा मारा

आंध्रप्रदेशेच्या मछलीपटनममधल्या एका जाहीर सभेत अभिनेता चिरंजीवी यांना अंड्यांचा मार खावा लागलाय. त्यांनी नरेंद्र मोदींना `हिलटर` म्हणून संबोधल्यानं ही वेळ त्यांच्यावर आली.

Apr 26, 2014, 07:43 PM IST

मोंदीची आज धुळ्यात जाहीर सभा

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची आज धुळ्यात सभा होतीय. धुळे लोकसभा मतदारसंघातले उमेदवार डॉ.सुभाष भामरे यांच्या प्रचारासाठी होणा-या या सभेची जय्यत तयारी करण्यात आलीय.

Apr 22, 2014, 09:13 AM IST

राहुल गांधीच्या सभेला पवारांची दांडी, आघाडीत बिघाडी!

मुंबईत झालेल्या राहुल गांधींच्या जाहीर सभेला शरद पवारांनी दांडी मारल्यानं काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत बिघाडी निर्माण झालीय. पवारांनी राहुल गांधींसोबत व्यासपीठावर बसण्याचं टाळून, त्यांच्या नेतृत्वालाच आव्हान दिलंय. तर शरद पवार निवडणुकीनंतर वेगळा सूर तर लावणार नाहीत ना. अशी शंकाही घेतली जातेय.

Apr 22, 2014, 09:09 AM IST

राहुल गांधी गरिबीची थट्टा करतात, मोदींचा हल्लाबोल

बीकेसीमध्ये झालेल्या सभेत नरेंद्र मोदींनी माँ-बेटेकी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. या सरकारमध्ये कुठलंही उत्तर देण्याची हिंमत नाही, हे फक्त गरिबीची थट्टा करतात आणि राहुल गांधी गरिबीचं टुरिझम करतात, असा हल्लाबोल त्यांनी केलाय. मोदींनी भाषणाची सुरुवात मराठीतून केली आणि भाषणात सुरुवातीलाच त्यांनी बाळासाहेब ठाकरेंची आठवण काढली.

Apr 21, 2014, 09:29 PM IST

`उद्धट` लोकांसाठी मी ही उद्धट, उद्धव ठाकरेंचं पवारांना प्रत्युत्तर

मुंबईत आज महायुतीची सभा झाली. या सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि सरकारवर कडाडून टीका केली. महाराष्ट्रातील जनता नरेंद्र मोदींना निराश करणार नाही. आम्ही निवडणुकीसाठी ढाणे वाघ रिंगणात उतरवले आहेत. ते कुठंही कमी पडणार नाहीत, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी विजयाचा विश्वास बोलून दाखवला.

Apr 21, 2014, 09:11 PM IST

सोनिया गांधींची नंदुरबारमध्ये सभा

नंदुरबारमध्ये काँग्रेसचे उमेदवार माणिकराव गावित यांच्या प्रचारासाठी काँग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी सभा घेणार आहेत. नंदुरबार आणि गांधी घराणं यांचं अनोखं नातं आहे.

Apr 20, 2014, 09:24 AM IST

जळगावात आज नरेंद्र मोदींची सभा

राज्यात तिसऱ्या टप्प्यातलं मतदान २४ एप्रिलला होणार आहे. त्यात सुट्टीच्या रविवारी मतदारांपर्यंत पोहण्यासाठी राजकीय पक्षांच्या सभा आयोजित करण्यात आल्यात.

Apr 20, 2014, 09:18 AM IST

बाळासाहेब थोरातांच्या सभेत `नमो नमो`च्या घोषणा

नरेंद्र मोदींची लाट नाही असा दावा काँग्रेस वारंवार करतयं... पण महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना मात्र प्रचार सभेतच मोदी लाटेचा अनुभव आला..

Apr 16, 2014, 02:27 PM IST

कोकणात आज ठाकरे- पवार आमने सामने

आजचा दिवस कोकणासाठी झंजावाती असणार आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या आज कोकणात सभा होताहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज कणकवली आणि रत्नागिरीत जाहीर सभा होतीये.

Apr 13, 2014, 08:40 AM IST

मोदी गुजरातमध्ये बोलणार, महाराष्ट्रात थ्रीडी सभा!

भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची थ्रीडी सभा आयोजित करण्यात आली आहे. या थ्रीडी सभेची खासियत म्हणजे एकाचवेळी ही सभा संपूर्ण देशात थ्रीडीच्या माध्यमातून दिसणार आहे. याआधी जगात प्रथमच थ्रीडी तंत्रज्ञान वापर करुन निवडणूक प्रचार करण्याचा विक्रम मोदींनी विधानसभा निवडणुकीत केला होता. आगामी निवडणुकीसाठीही अशा तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.

Apr 3, 2014, 04:25 PM IST

लोकसभेची जागा कोणत्याही परिस्थितीत आलीच पाहिजे - राज

आपली लोकसभेची जागा कोणत्याही परिस्थितीत आलीच पाहिजे. आपले उमेदवार निवडून आले पाहिजेत. शिरूर लोकसभा मतदार संघात माझ्या दोन - तीन सभा घेण्याचे निश्चित केले आहे, अशी माहिती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कृष्णकुंजवर दिली.

Mar 19, 2014, 04:10 PM IST