Maharashtra Assembly Election 2024: 'राणांगणात लढायला वाघाचं काळीज लागतं,' असं म्हणत ओबीसी आरक्षणाची मागणी करणाऱ्या लक्ष्मण हाकेंनी मनोज जरांगे पाटलांवर निशाणा साधला आहे. जरांगेंनी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार न देण्याची भूमिका जाहीर केल्यानंतर हाकेंनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच बारामतीकरांच्या सांगण्यावरुन जरांगेंनी माघार घेतल्याचा दावा हाकेंनी केला आहे. त्यांनी अप्रत्यक्षपणे शरद पवारांवर निशाणा साधला आहे. एवढ्यावरच न थांबता आम्ही ओबीसी उमेदवार उभे केले असून जरांगेंना पाठिंबा देणाऱ्यांना पाडणार, असंही हाके म्हणालेत.
"मी नेहमी सांगत आलो होतो की, ते निवडणूक लढणार नाहीत किंवा सामोरे जाणार नाहीत. बारामतीच्या स्क्रिप्टनुसार ते वागत आहेत. जत्रा भरवणं सोप असत लढणं अवघड असतं," असा टोला लक्ष्मण हाकेंनी जरांगेंनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर पहिली प्रतिक्रिया नोंदवताना लगावला आहे. "लोकसभेला बारामतीकरांच्या सांगण्यावरून त्यांनी प्रचार केला. आज ओबीसी एकवटला त्यामुळे त्यांनी रणांगणातून माघार घेतली आहे," असंही हाके म्हणाले. तसेच, "बारामतीकरांच्या सांगण्यावरून त्यांनी रणांगणातून माघार घेतली आहे. राणांगणात लढायला वाघाचं काळीज लागतं गनिमी काव्याचा काळ गेला," असंही हाके म्हणाले आहेत. "दिवसाला भूमिका बदलणार माणूस," असा उल्लेख तर लक्ष्मण हाकेंनी, "मुंबई वेशीवरून माघारी आले. त्याचा अभ्यास नाही. राजकारण, निवडणूक याचा त्यांचा अभ्यास नाही," असंही म्हटलं.
"ज्या ज्या मुख्यमंत्र्यांनी पाठींबा दिला आहे त्यांचं आता काम करणार नाही. ज्यांनी जरांगे पाठींबा दिला त्याचा कार्यक्रम ओबीसी पाडणार. ज्यांनी पत्र दिले त्यांना भेटले त्याचा कार्यक्रम करणार. ओबीसीचा समाजाचा वापर करून निवडून आले. आमचे पण काही उमेदवार आहेत. अनेक ठिकाणचे उमेदवार निवडून येणार आहेत. निवडणुकीत आमचे ओबीसी उमेदवार आहेत. 10 ते 12 मतदारसंघात आमचे उमेदवार आहेत. काही मतदारसंघात अनेक ओबीसींनी अर्ज केले आहेत. मराठवाड्यातील 7 ते 8 जिल्ह्यातील आम्ही काम करत आहोत. ओबीसी 70 जागा लढणार आहेत. काही ठिकाणी आम्ही 30 ते 35 ठिकाणी पाठिंबा देणार आहोत. शरद पवार याच्या उमेदवाराला पाठींबा असेल पण त्यांना ओबीसी बाबत भूमिका, पाठिंबा, लेखी देणार असतील तरच पाठिंबा असेल. त्यांचा ओबीसींना विरोध असेल तर आमचा त्यांना विरोध असेल," असं हाकेंनी स्पष्ट केली आहे.
नक्की वाचा >> उमेदवारांची यादी दूरच जरांगेंनी निवडणुकीतून घेतली माघार! म्हणाले, 'मराठा बांधवांनी त्यांचे सर्व...'
"अशोक चव्हाण यांच्या विरोधात सभा घेतली आहे. त्यांनी ओबीसी बाबत भूमिका घेतली आहे. जो माणूस ओबीसी आरक्षणाच्या बाजूला असेल त्यांना आमचा पाठींबा असेल. मी पळ काढणारा नाही. तीन वाजेपर्यंत वाट पाहा. ओबीसी हक्क, अधिकार यासाठी लढणार. सोशल मीडियावर जी माझ्यावर टीका होत आहेत त्यांना ओबीसी जनता उत्तर देईल. आरक्षण हे जातीवर दिलं जात नाही आरक्षण हे प्रवर्गावर दिलं जातं," असं हाके म्हणाले.