ज्येष्ठ कामगार नेते शरद राव यांचं निधन
ज्येष्ठ कामगार नेते शरद राव यांचं निधन
Sep 1, 2016, 07:39 PM ISTकामगार नेते शरद राव यांचं निधन
कामगार नेते शरद राव यांचं दीर्घ आजारानं निधन झालं आहे. शरद राव यांच्या राहत्या घरी आज त्यांचं निधन झालं. शरद राव यांनी अनेक कामगार संघटनांचं नेतृत्व केलं होतं. शरद राव हे रिक्षा-टॅक्सी युनियनमध्ये जास्त लोकप्रिय होते. रिक्षा-टॅक्सीच्या भाडेवाढीसंदर्भात त्यांची भूमिका महत्वाची ठरत असे.
Sep 1, 2016, 05:00 PM ISTरावांचा रिक्षा बंदचा डाव फसला, हायकोर्टाची चपराक!
नागरिकांना वेठीस धरून भाडेवाढीसाठी जाहीर केलेला दोन दिवसीय बंद मागे घेण्यात आलाय. २१ ऑगस्ट मध्यरात्रीपासूनच्या संपाचा कामगारनेते शरद राव यांचा डाव मुंबई हायकोर्टानं उधळून लावलाय.
Aug 21, 2013, 10:32 AM ISTरिक्षा संप, राव राणे आमनेसामने
२१ तारखेपासून पुकारण्यात आलेल्या रिक्षाचालकांच्या संपाच्या मुद्द्यावर आता नितेश राणे आणि शरद राव आमने सामने उभे राहीलेत. हा संप मोडून काढू असा इशारा राणे यांनी दिलाय तर राव यांनी राणेंच्या या दाव्याची खिल्ली उडवलीय.
Aug 17, 2013, 06:20 PM ISTमुंबईकरांना दिलासा, बेस्ट, रिक्षांचा नियोजित संप मागे
कामगार नेते शरद राव यांनी उद्यापासून संप मागे घेतलाय. राज्य आश्वासन मिळाल्यामुळे संध्याकाळी झालेल्या बैठकीत हा संप मागे घेण्याचा निर्णय घेण्य़ात आला.
Jun 17, 2013, 06:16 PM ISTकामगार संघटनांचा 'भारत बंद'; मुंबई सुरूच!
कामगार संघटनांनी आजपासून दोन दिवसांचा देशव्यापी संप पुकारलाय. परंतू, बेस्ट बस, एसटी, रिक्षा, टॅक्सी सेवा सुरू राहणार आहेत तसंच अत्यावश्यक सेवांवरही परिणाम होणार नाही. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळालाय.
Feb 20, 2013, 07:56 AM ISTपृथ्वीराज चव्हाण `मनसे`ला पोसत आहेत - शरद राव
`ज्याप्रमाणे वसंतराव नाईक यांनी शिवसेना पोसली त्याचप्रमाणे पृथ्वीराज चव्हाण मनसे पोसत आहेत, गरिब कामगारांना नेस्तनाबूत करण्याचा डाव मुख्यमंत्र्यांनी आणि मनसेनं रचलाय`
Jan 19, 2013, 02:33 PM ISTरिक्षाभाडंही सामान्यांच्या आवाक्याबाहेर जाणार?
रिक्षासाठी किमान भाडे ३४ रुपये करण्याची मागणी मुंबई ऑटो रिक्षामेन्स युनियनचे नेते शरद राव यांनी केलीय.
May 24, 2012, 12:11 PM ISTशरद रावांनी घेतली राज्यपालांची भेट
महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा विधेयक 2011 रद्द करावा यासाठी आज कामगार संघटनांनी राज्यपाल के. शंकर नारायणन यांची भेट घेतली. महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परीरक्षण हे विधेयक पूर्णत: बेकायदेशीर भारतीय घटनेच्या विरोधी आणि औद्योगिक कल कायदा 1947 चा भंग करणारं आहेत.
Apr 25, 2012, 06:58 PM ISTरिक्षा संपकऱ्यांविरोधात RTOचा बडगा
अंधेरी आरटीओनं 198 संपकरी रिक्षा मालकांना कारणे दाखवा नोटिस बजावली आहे. मोटार वाहन अधिनियमानुसार रिक्षा चालकांचा हा संप शिक्षेस पात्र असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याच्या भूमिकेवर आरटीओ ठाम आहे.
Apr 17, 2012, 09:11 PM ISTरिक्षाचालकांचा संप, नागरिकांना कंप
रिक्षा भाडेवाढीसाठी ऑटो रिक्षा मेन्स युनियननं पुकारलेल्या बंदमुळे नवी मुंबईतल्या प्रवाशांचे हाल होत आहेत. रिक्षाचालकांच्या बेमुदत संपावरुन शरद रावांनी माघार घेत आज लाक्षणिक संप पुकारला आहे.
Apr 16, 2012, 04:21 PM ISTरिक्षाचालकांचा आज लाक्षणिक संप
रिक्षाचालकांच्या बेमुदत संपावरुन शरद रावांनी माघार घेत आज लाक्षणिक संप पुकारला आहे. सीएनजीपाठोपाठ पेट्रोल रिक्षाच्या दरातही वाढ करण्यात यावी, अशी मागणी ऑटोरिक्षा मालक-चालक संघटना कृती समितीनं केली आहे.
Apr 16, 2012, 04:03 PM ISTशरद राव नरमले, संप एका दिवसासाठीच
संपात सहभागी न होणाऱ्या रिक्षाचालकांना धमकावणाऱ्यांवर कारवाईसाठी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. मुंबईसह संपूर्ण राज्यातील रिक्षा सोमवारपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला.
Apr 15, 2012, 05:54 PM ISTरिक्षाचालकांचा संप अटळ- शरद राव
राज्यभरातील रिक्षा चालकांनी १५ एप्रिलनंतर बेमुदत संपाचा इशारा दिला आहे. रिक्षा संघटनांच्या कृती समितीची आज पुण्यात बैठक झाली. त्यात राज्य सरकारकडं १८ मागण्या मांडण्यात आल्या.
Mar 12, 2012, 10:40 PM ISTरिक्षा युनियनचा १६ एप्रिलपासून संपाचा इशारा
मुंबईत १६ एप्रिलपासून रिक्षा युनियनने बेमुदत संपाचा इशारा दिला आहे. भाडेवाढीची मागणी मान्य न झाल्यास संपाचे हत्यार उपसावे लागेल असं युनियनचे अध्यक्ष शरद राव यांनी म्हटलं आहे.
Mar 1, 2012, 05:59 PM IST