www.24taas.com, मुंबई
रिक्षासाठी किमान भाडे ३४ रुपये करण्याची मागणी मुंबई ऑटो रिक्षामेन्स युनियनचे नेते शरद राव यांनी केलीय.
पहिला टप्पा दोन किलोमीटरचा करावा, पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी १७ रुपये भाडे द्यावं, मूळ भाड्याच्या १५० टक्के भाडे मिळावे आणि नाईट चार्ज रात्री १२ ऐवजीपासून ११ वाजल्यापासून सुरु करावा अशा मागण्या शरद राव यांनी यावेळी केल्यात.
रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडेवाढीचे सूत्र ठरवण्यासाठी पी.एम.ए. हकीम यांच्या अध्यक्षतेखाली एकसदस्यीय समिती नेण्यात आलीय. हकीम यांच्या आयोगापुढे राव यांनी आपल्या मागण्या मांडल्यात. या मागण्या मान्य झाल्यास रिक्षाभाडे ‘बीएमडब्ल्यू’पेक्षा महाग ठरण्याची शक्यता आहे.