माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी लीलावतीत
भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याच्या छातीत दुखू लागल्याने त्याला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर उपचार करण्यात येत असून डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे.
Nov 29, 2013, 12:48 PM IST'दोस्त दोस्त ना रहा'; विनोदचा सचिनवर इमोशनल अत्याचार
‘सचिनला माझ्याविरूद्ध काही लोक भडकवत होते… यात त्यांना यश मिळाल्याचं सध्या दिसतंय’ असं खुद्द सचिनचा एकेकाळचा मित्र विनोद कांबळीने म्हटलंय.
Nov 20, 2013, 07:32 PM IST... आणि सचिन बालमित्राला विसरला?
निवृत्तीनंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं अंधेरीतल्या एका हॉटेलमध्ये जंगी पार्टी दिली. या पार्टीला क्रिकेट विश्व, बॉलिवूड आणि राजकारणातले अनेक दिग्गज हजर होते. मात्र या पार्टीत नव्हता तो सचिनचा बालमित्र... सचिननं त्याला आमंत्रणच दिलं नव्हतं... हा मित्र म्हणजे विनोद कांबळी...
Nov 19, 2013, 10:50 AM ISTविनोद कांबळीला परदेशी महिलेने म्हटले `ब्लॅक इंडियन `
क्रिकेटपटू विनोद कांबळीला `ब्लॅक इंडियन ` म्हणून एका परदेशी महिलेने हिणवलं. बांद्रा येथे राहणाऱ्या विनोद कांबळीच्या सोसायटीमध्ये पार्किंगवरून या महिलेने वाद घातला.
Oct 25, 2013, 08:50 AM ISTतेंडुलकर-कांबळीचा विक्रम वाळवीनं पोखरलाय
सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांनी शारदाश्रमकडून खेळतांना ही ६६४ रन्सची रेकॉर्ड पार्टनरशीप केली होती. या मॅचमध्ये सचिन तेंडुलकरनं नॉट आऊट ३२६ रन्स आणि विनोद कांबळीनं नॉट आऊट ३४९ रन्सची इनिंग खेळली होती. मात्र, या दोघांचा हाच विक्रम वाळवीनं पोखरलाय.
Feb 27, 2013, 10:08 PM ISTआचरेकर सरांच्या वाढदिवशी सचिनची उपस्थिती
सचिनला बालपणी क्रिकेटचे धडे देणारे आचरेकर शनिवारी ७९ वर्षांचे झाले. यावेळी सचिनने खास उपस्थिती लावून आचरेकर सरांना दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. सचिन, विनोद कांबळी, प्रवीण आमरे यावेळी उपस्थित होते.
Dec 5, 2011, 05:45 AM ISTकांबळीचे वक्तव्य बेजबाबदारपणाचे- शरद पवार
विनोद कांबळीने १९९६ साली झालेल्या वर्ल्ड कप सेमी फायनल मॅच फिक्सिंग संदर्भात केलेलं वक्तव्य बेजबाबदारपणाचं असल्याची प्रतिक्रिया आयसीसीचे अध्यक्ष शरद पवारांनी व्यक्त केली आहे. सचिन तेंडूलकर आणि सौरव गांगुली यांचे याबाबतीत काय म्हणणं आहे यावर मी विश्वास ठेवेन असं पवार म्हणाले. मला प्रामाणिकपणे असं वाटतं की कांबळीने केलेले वक्तव्य बेजबाबदारपणाचे असल्याचं पवार म्हणाले.
Nov 19, 2011, 03:46 PM IST