तेंडुलकर-कांबळीचा विक्रम वाळवीनं पोखरलाय

सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांनी शारदाश्रमकडून खेळतांना ही ६६४ रन्सची रेकॉर्ड पार्टनरशीप केली होती. या मॅचमध्ये सचिन तेंडुलकरनं नॉट आऊट ३२६ रन्स आणि विनोद कांबळीनं नॉट आऊट ३४९ रन्सची इनिंग खेळली होती. मात्र, या दोघांचा हाच विक्रम वाळवीनं पोखरलाय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 27, 2013, 10:15 PM IST

www.24taas.com, मुंबई
सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांनी शारदाश्रमकडून खेळतांना ही ६६४ रन्सची रेकॉर्ड पार्टनरशीप केली होती. या मॅचमध्ये सचिन तेंडुलकरनं नॉट आऊट ३२६ रन्स आणि विनोद कांबळीनं नॉट आऊट ३४९ रन्सची इनिंग खेळली होती. मात्र, या दोघांचा हाच विक्रम वाळवीनं पोखरलाय.
सचिन तेंडुलकरनं शालेय जीवनापासून क्रिकेट गाजवायला सुरुवात केली होती. सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळीनं हॅरिस शिल्डमध्ये केलेली रेकॉर्डब्रेक कामगिरी दोघांच्याही करिअरला कलाटणी देणारी ठरली होती. सेंट झेवियर्स हायस्कूलविरुद्धच्या मॅचमध्ये सचिन आणि विनोदनं धुवाँधार बॅटिंग करत रेकॉर्ड केला होता.
या रेकॉर्डब्रेक पार्टनरशीपच्यावेळी सचिन १४ वर्षांचा तर विनोद १६ वर्षांचा होता. त्यांच्या या पार्टनरशीपची चर्चा आजही भारतीय क्रिकेटविश्वात होते. आझाद मैदानात २३ ते २५ फेब्रुवारी १९८८ मध्ये ही मॅच खेळवण्यात आली होती. आणि या मॅचमध्ये सचिन आणि विनोदनं ट्रीपल सेंच्युरी झळकावत अवघ्या क्रिकेटविश्वाला आपली दखल घ्यायला भाग पाडली होती.

सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळीनं तब्बल दोन दिवस मैदानावर तग धरून बॅटिंग केली होती. सचिन तेंडुलकरनं नॉट आऊट ३२६ रन्स आणि विनोद कांबळीनं नॉट आऊट ३४९ रन्सची इनिंग खेळत ६६४ रन्सची पार्टनरशीप करत विक्रमाला गवसणी घातली होती.

या मॅचमध्ये शारदाश्रमचे कोच रमाकांत आचरेकरांनी विनोद आणि सचिनला इनिंग घोषीत करण्यास वारंवार सांगत होते. मात्र, या दोघांनी आचरेकर सरांच्या सुचनेकडे दुलर्क्ष केलं या मॅचदरम्यान आचरेकर सर स्वत: मैदानात उपस्थित नव्हते. त्यांच्याऐवजी लक्ष्मण चौहान मैदानात होते. त्यांनी आचरेकर सरांचा निरोप या दोघांकडे पोहचवला. मात्र, सचिन-विनोद खेळत राहिले. अखेर आचरेकरांनी या दोघांना फोन करून इनिंग घोषीत करण्यास सांगितली. या पार्टनरशीपनंतरच सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळीला एक वेगळ वलय प्राप्त झालं असचं म्हणाव लागणार आहे.