लोकसभेत जमीन अधिग्रहण आणि पुनर्वसन विधेयक मंजूर
लोकसभेत मंजुरीसाठी ठेवलेल्या `जमीन अधिग्रहण आणि पुनर्वसन विधेयक २०११` ला मंजुरी मिळाली आहे. अन्न सुरक्षा विधेयकानंतर यूपीए सरकारचं आणखी एक महत्वाचं विधेयक लोकसभेत मंजूर झालं आहे.
Aug 30, 2013, 09:01 AM ISTपोटभर जेवणार लोक, युपीएचा `मास्टरस्ट्रोक`!
लोकसभेने संमत केलेले अन्न सुरक्षा विधेयक म्हणजे काँग्रेस मत सुरक्षा विधेयक असल्याची टीका होतेय. पण ही योजना खरोखरच प्रामाणिकपणे राबवण्यात आली तर भारतातील सुमारे 82 कोटी गरीबांची भूक मिटणार आहे.
Aug 27, 2013, 08:21 PM ISTअन्न सुरक्षा विधेयक लोकसभेत मंजूर
युपीए सरकारचं सर्वात महत्वकांक्षी असं अन्न सुरक्षा विधेयक लोकसभेत मंजुर झालंय. अन्न सुरक्षा विधेयकाचा युपीए सरकारचा ऐतिहासिक निर्णय सरकारच्या बाजून लागला आहे.
Aug 26, 2013, 11:16 PM ISTअन्नसुरक्षेसाठी काँग्रेसचा खासदारांना ‘व्हिप’
सोनिया गांधी आणि काँग्रेसच्या महत्त्वाकांशी अन्नसुरक्षा विधेयकासाठी आज लोकसभेत चर्चा होणार असल्याचं सरकारकडून जाहीर करण्यात आलंय. अन्नसुरक्षा विधेयकासह आणखीही काही महत्त्वपूर्ण विधेयकं आज, लोकसभेत मांडण्यात येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर या विधेयकांच्या मंजुरीसाठी काँग्रेसनं कंबर कसलीय. अधिवेशन संपेपर्यंत सर्व खासदारांना दररोज हजर राहण्यासाठी काँग्रेस ‘व्हिप’ जारी केलाय.
Aug 26, 2013, 08:22 AM ISTनरेंद्र दाभोलकरांच्या हत्येचे पडसाद संसदेत
डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येचे पडसाद आज संसदेत उमटले. या हत्येचा राज्यसभेनं एकमुखानं निषेध केला. काँग्रेसचे हुसेन दलवाई यांनी सनातन, हिंदू जनजागृती समिती यासारख्या कडव्या संस्थांवर बंदी घालण्याची मागणी केली. राज्य सरकारनं पाठवलेल्या प्रस्तावर केंद्रानं तातडीनं विचार करावा, अशी मागणी दलवाई यांनी केली.
Aug 22, 2013, 01:58 PM IST‘२० ऑगस्ट वैज्ञानिक दृष्टिकोन दिवस हवा’
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या पुण्यात झालेल्या हत्येचे पडसाद दिल्लीतही उमटले. दाभोलकर यांच्या हत्येनंतर दिल्लीतील अनेक वैज्ञानीक एकत्र आले आणि त्यांनी या घटनेचा निषेध केला. ‘२० ऑगस्ट वैज्ञानिक दृष्टिकोन दिवस हवा’, अशी त्यांनी मागणी केली.
Aug 22, 2013, 12:17 PM ISTपंतप्रधानांच्या खुर्चीत सुषमा स्वराज बसतात तेव्हा...
भारतीय निवडणूक अभियान समिती अध्यक्ष नरेंद्र मोदी पक्षाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार जाहीर करण्यात आले असले तरीही किंवा त्यांच्याकडे पाहिले जात असले तरी मंगळवारी काहीकाळ पंतप्रधान खुर्चीवर सुषमा स्वराज बसल्या.
Aug 20, 2013, 01:38 PM IST‘अन्न सुरक्षे’साठी काँग्रेस खासदारांना व्हीप!
काँग्रेसचं आणि मुख्य म्हणजे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचं महत्त्वांकाशी विधेयक असलेल्या अन्न सुरक्षा विधेयकावर आज लोकसभेत चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळं लोकसभा आणि राज्यसभेतल्या आपल्या खासदारांसाठी काँग्रेसनं व्हीप जारी केलाय. संसदेत हजर राहणं आणि मतदान करण्यासंबंधीचा हा व्हीप आहे.
Aug 14, 2013, 08:36 AM ISTकिश्तवाड हिंसाचार, राबर्ट वडेरा प्रकरणावरुन विरोधक आक्रमक
संसदेत विविध मुद्यांवरुन विरोधकांनी सरकारला धारेवर धरलंय..त्यामुळं गेला आठवडा आणि कालच्या दिवशी संसदेचं कामकाज व्यवस्थित होऊ शकलं नाही. हा तिढा सोडवण्यासाठी आता कमलनाथ यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावलीय.
Aug 13, 2013, 01:02 PM ISTसंसदेत किश्तवाड हिंसाचाराचे पडसाद!
काश्मीरमधल्या किश्तवाड हिंसाचाराचे पडसाद संसदेत उमटलेत. राज्यसभेत विरोधी पक्षनेते अरूण जेटली यांना आधी बोलू देण्यावरून सरकारी बाकांवरून गोंधळ घातला गेला. त्यामुळे कामकाज तहकूब करावं लागलं.
Aug 12, 2013, 02:42 PM ISTसेनेचे ‘सर’ लोकसभेसाठी सज्ज, पण...
‘आपण लोकसभा निवडणुकीच्या रेसमध्ये आहोत’ असं शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी स्पष्ट केलंय.
Aug 9, 2013, 05:30 PM ISTलोकसभेत सोनिया-राहुल गांधींची ‘दांडी’ अधिक
काँग्रेसचे युवराज राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांची वेगळीच `दांडी`यात्रा सध्या सुरू आहे.लोकसभेच्या निम्म्याहून अधिक बैठकांना दांडी मारणा-या ९२ खासदारांमध्ये राहुल गांधीसोबतच यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांचाही समावेश आहे.
Aug 6, 2013, 09:23 AM ISTनरेंद्र मोदींची बाजी, नितीश कुमारांना फटका
विधानसभा पोट निवडणुकीत गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाने सहा पैकी पाच जागांवर विजय मिळविला असून, दोन लोकसभा आणि तीन विधानसभेच्या जागांचा समावेश आहे. २०१४च्या सेमी फायनलमध्ये नरेंद्र मोदींनी बाजी मारलीय. या यशामुळे भाजपमध्ये मोदींचं महत्त्व वाढलंय. तर बिहारमध्ये नितीश कुमारांना फटका बसला.
Jun 5, 2013, 07:45 PM ISTरेल्वे लाचखोर प्रकरणावरुन संसदेत गदारोळ
रेल्वे लाचखोर प्रकरणावरुन संसदेत विरोधकांनी गदारोळ घातला. पंतप्रधानांसह रेल्वेमंत्री बन्सल आणि कायदामंत्री अश्विनीकुमार यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपनं केलीये.
May 6, 2013, 12:16 PM ISTसंसदेतील गोंधळाला सोनिया गांधी जबाबदार - सुषमा
संसदेमध्ये सध्या होत असलेल्या गोंधळाला काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी जबाबदार आहेत, असा थेट आरोप लोकसभेतील विरोधी पक्ष नेत्या सुषमा स्वराज यांनी केलाय.
Apr 30, 2013, 08:49 PM IST