www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या पुण्यात झालेल्या हत्येचे पडसाद दिल्लीतही उमटले. दाभोलकर यांच्या हत्येनंतर दिल्लीतील अनेक वैज्ञानीक एकत्र आले आणि त्यांनी या घटनेचा निषेध केला. ‘२० ऑगस्ट वैज्ञानिक दृष्टिकोन दिवस हवा’, अशी त्यांनी मागणी केली.
दाभोळकरांच्या मारेक-यांना लवकरात लवकर पकडा आणि जादूटोणा विरोधी कायदा राज्यात तसाच केंद्रातही आणण्याचीही मागणी त्यांनी यावेळी केली. तसंच दाभोलकरांच्या स्मृती प्रित्यर्थ २० ऑगस्ट हा दिवस सरकारनं वैज्ञानिक दृष्टिकोन दिवस म्हणून घोषीत करावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचे लोकसभेत पडसाद उमटले आहेत. ही घटना वाईट आणि दु:खत आहे. लोकसभेबरोबर राज्यसभेतही पडसाद उमटले. राज्यसभेत हत्येची निंदा करण्यात आली. काँग्रेस खासदार रजनी पाटील यांनी याबाबत नोटीस दिली होती. निवदेन करण्याची मागणी करण्यात आली.
दरम्यान, समाजातील अंधश्रद्धेविरूद्ध लढणारे सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर अखेर महाराष्ट्र सरकारला जाग आलीय. गेल्या १८वर्षांपासून रखडलेल्या जादूटोणा विरोधी विधेयकासंदर्भात वटहुकूम काढण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतलाय. वटहुकूमाला वारक-यांनी विरोध दर्शवलाय, तर शिवसेना, भाजप आणि मनसे या राजकीय पक्षांनी सावध भूमिका घेतली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.