रुपया

रुपया घसरला: चीनी युवानच्या अवमूल्यनाचा परिणाम रुपयावर

डॉलरच्या तुलनेत आज रुपयानं दोन वर्षातली नीचांकी पातळी गाठलीय. एका डॉलरसाठी आज सकाळी ६४ रुपये ८५ रुपये मोजावे लागत आहेत. ४सप्टेंबर २०१३ नंतर रुपया प्रथमच या स्तरावर गडगडलाय. 

Aug 12, 2015, 10:31 AM IST

खुशखबर! सोन्याची घसरगुंडी सुरूच, लवकरच 24 हजार

सोनं आणि चांदीच्या दरात घसरण सुरूच आहे. आतंरराष्ट्रीय बाजारातील बदलत्या घडामोडींमुळं दोन्ही धातूंच्या किमतीत घसरण कायम आहे. येत्या काही दिवसांत सोनं 24 हजारांपर्यंत उतरेल, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.

Jun 8, 2014, 08:16 AM IST

टीव-टीवमुळं चेतन भगत गोत्यात!

“रुपया म्हणतोय, माझ्यावर बलात्कार करणाऱ्यांना शिक्षा होणार की नाही?” अशा स्वरुपाचं ट्विट करुन प्रसिद्ध लेखक चेतन भगत पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. डॉलरच्या तुलनेत रुपयाचं अवमूल्यन होत असल्याचं पाहून चेतन भगत यांनी ट्विट करुन रुपयाची तुलना बलात्काराशी केली. या ट्विटबाबत सोशल नेटवर्किंग साईट्सवर प्रचंड नाराजी व्यक्त केली गेली. त्यामुळं अखेर चेतन भगत यांनी वादग्रस्त ट्विट डिलिट केलं.

Aug 29, 2013, 12:42 PM IST

घसरला रुपया, वाढल्या समस्या!

रुपयाच्या घसरणीमुळे परदेशात शिक्षण घेणा-या मुलांच्या पालकाचं आर्थिक गणित बिघडलय. तर ट्रॅव्हल्स कंपनीच्या व्यवसायावरही 20 टक्के परिणाम झालाय.

Aug 28, 2013, 06:33 PM IST

रुपयाचं पतन सुरूच; गाठली सर्वांत खालची पातळी!

थोडाफार सावरतोय अशी चिन्हं दिसता-दिसताच रुपया पुन्हा एकदा धडामदिशी खाली आदळलाय. मंगळवारी शेअरबाजार आणि रुपयाच्या मूल्यासाठी अनलकी ठरलाय.

Aug 27, 2013, 12:38 PM IST

रुपया घसरला, बाजार कोसळला!

सोमवारी सकाळी शेअर बाजार सुरू होताच बाजाराला चांगलाच दणका बसलाय. डॉलरच्या तुलनेत रुपयाची ऐतिहासिक घसरण होतेय. रुपयाच्या घसरणीमुळं त्याचा परिणाम सेंसेक्सवरही झालाय. शेअर बाजार सकाळच्या पहिल्या सत्रात तब्बल २०० अंशांनी घसरलाय.

Aug 19, 2013, 10:07 AM IST

रुपयाची घसरण, अशुभ चिन्हाचा परिणाम!

भारतीय चलनाचं म्हणजेच रुपयाचं बोध चिन्ह जेव्हापासून ठरलं तेव्हापासून रुपयाची घसरण झपाट्यानं होतंय. हे आमचं म्हणणं नाही तर हे म्हणणं आहे अंकशास्त्र, वास्तुशास्त्र, लिपीशास्त्र आणि प्रतीक चिन्हांच्या अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञांचं.

Aug 18, 2013, 02:45 PM IST

रुपयाचं मूल्यं ठरवणार सोन्याची किंमत?

गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याच्या दरात फारच घसरण सुरु होती मात्र सध्या सोने दरात पुन्हा तेजी दिसून येतेय...

Jul 21, 2013, 12:15 PM IST

कम्प्युटर, लॅपटॉपच्या किंमती वाढणार?

डॉलरच्या तुलनेत रुपया कमी झाल्याचा परिणाम आता कम्प्युटर आणि लॅपटॉपच्या किंमतींवरदेखील होण्याची शक्यता आहे. वाढलेल्या महागाईमुळे आयटीसंबंधी उत्पादनांच्या किंमतीत १० टक्क्यांनी वाढ होऊ शकते.

Jul 18, 2013, 03:57 PM IST

रुपयाची ऐतिहासिक घसरगुंडी...

सोमवारी मार्केटमध्ये सुरुवातीलाच डॉलरच्या तुलनेत रुपयाचा विनिमय दर ढासळलाय. आता, एका डॉलरसाठी ६१ रुपये मोजावे लागणार आहेत.

Jul 8, 2013, 03:27 PM IST