www.24taas.com , झी मीडिया, हावडा
भारतीय चलनाचं म्हणजेच रुपयाचं बोध चिन्ह जेव्हापासून ठरलं तेव्हापासून रुपयाची घसरण झपाट्यानं होतंय. हे आमचं म्हणणं नाही तर हे म्हणणं आहे अंकशास्त्र, वास्तुशास्त्र, लिपीशास्त्र आणि प्रतीक चिन्हांच्या अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञांचं.
८ जुलै २०११ला रुपयाचं प्रतिक चिन्ह स्थापित झालं. तेव्हा प्रति डॉलर ४४.४४ रुपये मूल्य असलेला रुपया आता ६२ रुपयांपर्यंत घसरला आहे. त्यामुळं हे प्रतीक चिन्ह राष्ट्रासाठी ‘पनौती’ ठरल्याची भावना सर्व थरांमध्ये बळावलीय.
अंकशास्त्रानुसार या चिन्हाच्या स्थापनेचा दिवस बघता त्याचा जन्मांक ८ आणि मूल्यांक २ आहे. त्यातील ८ ‘शनी’चं प्रतीक, जुलै ७ हा ‘केतू’चा प्रतीक तर २०११ या आकड्यांची बेरीज करून येणारा ४ हा आकडा ‘राहू’चं प्रतीक आहे. अंकशास्त्रानुसार ०८-०७-२०११ ही तारीख अशुभकारक आहे.
हे झालं अंकशास्त्राचं मात्र वास्तुशास्त्रज्ज्ञ याबाबत सांगतात की, वास्तुशास्त्रानुसार वरच्या दिशेला कुबेराचं महाद्वार मानली जाणारी उत्तर दिशा आहे. पण चलनावरील रुपयाचं चिन्ह हे वायव्य कोनात आहे. ते स्थान पलायनासाठी सोपी जागा मानलं जातं. त्यातच ‘ या चिन्हावर टाकण्यात आलेल्या दोन आडव्या रेषांमुळं तर त्याचा जणू ‘शिरच्छेद’च करण्यात आलाय.
याशिवाय चलनी नोटांवरील गांधीजींचं मुख हे पश्चि‘म दिशेला असणंही अशुभ आहे. त्यांचं मुख पूर्वेला करा आणि चलनावरून ‘ हे ‘पनौती’ चिन्ह ताबडतोब हटवा. देशाच्या स्थितीत अनुकूल बदल झपाट्यानं होण्याचा चमत्कार घडेल, असं देशातल्या वास्तू आणि अंकशास्त्रतज्ज्ञांना वाटतं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.