www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
सोनं आणि चांदीच्या दरात घसरण सुरूच आहे. आतंरराष्ट्रीय बाजारातील बदलत्या घडामोडींमुळं दोन्ही धातूंच्या किमतीत घसरण कायम आहे. येत्या काही दिवसांत सोनं 24 हजारांपर्यंत उतरेल, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ-उतारामुळं भारतीय बाजारातील सोने दरावर परिणाम होत आहे. त्यामुळंच सोन्याचा दर सातत्यानं घसरताना पाहायला मिळतोय. आंतरराष्ट्रीय स्तरावर सावरणारं युक्रेन आणि इसीबीनं व्याज दरात केलेली कपात, यामुळं सोन्याच्या दरात कपात होईल, असा अंदाज वर्तविण्यात येतोय.
सध्या मुंबईत सोन्याचा प्रतितोळ्याचा दर 26 हजार 740 रुपये आहे. या दरातही घसरगुंडी होऊ शकते, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. याशिवाय डॉलरच्या तुलनेत वधारणारा रुपयामुळंही सोन्याची झळाळी कमी होण्याची शक्यता आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.