या वर्षीचे सर्वाधिक श्रीमंत भारतीय
सलग पाचव्या वर्षीही मुकेश अंबानी सर्वाधिक श्रीमंत भारतीय ठरले आहेत. फोर्ब्स मासिकाने नुकतीच श्रीमंत भारतीयांची यादी जाहीर केली. यात मुकेश अंबानी पुन्हा अव्वाल स्थानावर आहेत. खरंतर गेल्या तीन वर्षांपासून त्यांच्या संपत्तीत घट होत आहे. मात्र नुकसान होत असूनही त्यांची संपत्ती २१ अब्ज डॉलर्स एवढी अहे.
Oct 25, 2012, 11:58 AM ISTमुंबई इंडियन्स संघात मिकी माऊसची निवड
आजवर अनेकविध अविश्वनिय वाटणारे स्टंट मिकी माऊसने करुन दाखवले आहेत. पण आतापर्यंत क्रिकेटच्या मैदानावर मिकीने कधी कामगिरी करुन दाखवली नव्हती. आता मात्र मिकी लवकरच क्रिकेट विश्वातही भरारी मारण्यास सज्ज झाला आहे.
Mar 22, 2012, 04:14 PM ISTधीरुभाई अंबानींच्या स्मारकाचे अनावरण
रिलायन्स उद्योगसमुहाचे संस्थापक धीरुभाई अंबानींच्या स्मारकाचे उदघाटन जूनागढ जिल्ह्यातील चोरवाडमध्ये करण्यात आलं आहे. यावेळेस संपूर्ण अंबानी कुटुंब उपस्थित होतं. अंबानी कुटुंबाचे अध्यात्मिक गुरु रमेश भाई ओझा यांच्या हस्ते या स्मारकाचे अनावरण करण्यात आलं.
Dec 28, 2011, 08:06 PM ISTअंबानी बंधू पुन्हा एकत्र ?
येत्या बुधवारी जूनागढ जिल्ह्यातील चोरवाड येथे मुकेश आणि अनिलसहित संपूर्ण अंबानी कुटुंब एकत्र येणार आहे. बुधवारी धीरूभाईंच्या स्मारकाचं उद्घाटन होणार असून त्यासाठी दोघेही अंबानी बंधू एकत्र येणार आहेत.
Dec 27, 2011, 03:43 PM ISTमुकेश अंबानी खाऊ गल्लीत भेटीला येणार
देशातील खाजगी क्षेत्रातील बलाढ्य कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज पुढच्या वर्षी फास्ट फूड व्यवसायात प्रवेश करणार आहे. रिलायन्स या क्षेत्रात स्वताचा ब्रँड लँच करणार आहे. रिलायन्स याआधीच देशातील वेगाने वाढत्या युवा लोकसंख्येशी रिटेल आणि 4G वायरलेस सेवांच्या माध्यमातून नातं जोडलं आहे.
Dec 12, 2011, 06:20 PM ISTराडियांचा टाटा
टाटा उद्योगसमुह आणि मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची पब्लिक रिलेशन अकाऊंट सांभाळणाऱ्या वैष्णवी समुहाच्या निरा राडिया यांनी आपण व्यवसायातून निवृत्ती पत्करत असल्याची घोषणा केली. आपण कौटुंबिक जबाबदारी आणि स्वत:च्या आरोग्याकडे अधिक लक्ष देणार असल्याचं तसंच असून आता क्लायंटसशी नव्याने करार करणार नसल्याचं आणि संपर्क सल्लागार क्षेत्रातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचं निरा राडिया यांनी सांगितलं.
Nov 14, 2011, 08:20 AM IST