राडियांचा टाटा

टाटा उद्योगसमुह आणि मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची पब्लिक रिलेशन अकाऊंट सांभाळणाऱ्या वैष्णवी समुहाच्या निरा राडिया यांनी आपण व्यवसायातून निवृत्ती पत्करत असल्याची घोषणा केली. आपण कौटुंबिक जबाबदारी आणि स्वत:च्या आरोग्याकडे अधिक लक्ष देणार असल्याचं तसंच असून आता क्लायंटसशी नव्याने करार करणार नसल्याचं आणि संपर्क सल्लागार क्षेत्रातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचं निरा राडिया यांनी सांगितलं.

Updated: Nov 14, 2011, 08:20 AM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

 

टाटा उद्योगसमुह आणि मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची पब्लिक रिलेशन अकाऊंट सांभाळणाऱ्या वैष्णवी समुहाच्या निरा राडिया यांनी आपण व्यवसायातून निवृत्ती पत्करत असल्याची घोषणा केली. आपण कौटुंबिक जबाबदारी आणि स्वत:च्या आरोग्याकडे अधिक लक्ष देणार असल्याचं तसंच असून आता क्लायंटसशी नव्याने करार करणार नसल्याचं आणि संपर्क सल्लागार क्षेत्रातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचं निरा राडिया यांनी सांगितलं. आपण हा निर्णय पूर्ण विचाराअंती घेतल्याचंही त्यांनी जारी केलेल्या निवेदनात नमुद करण्यात आलं आहे. गेल्या काही काळात 2G स्पेक्ट्रम घोटाळ्या प्रकरणी निरा राडियांचे नाव दिर्घकाळ माध्यमांमध्ये प्रकाशझोतात राहिलं. निरा राडिया आणि बरखा दत्त तसंच वीर संघवी, रतन टाटा यांच्या संभाषणांच्या टेप लीक झाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. राडियांच्या विरोधात 2    G  स्पेक्ट्रम घोटाळ्या प्रकरणी कोणताही गुन्हा नोंदवण्यात आला नसला तरी या प्रकरणात सीबीआयने त्यांना साक्षीदार केलं आहे.

 

निरा राडियांच्या आश्चर्यकारक निर्णयाबद्दल टाटा उद्योगसमुह त्यांच्या व्यक्तिगत निर्णयाचा आदर करत असल्याचं तसंच राडियांनी शुन्यातून ही कंपनी उभारल्याचं रतन टाटांनी म्हटलं आहे. टाटा ब्रँडच्या जडणघडणीत वैष्णवीने महत्वपूर्ण हातभार लावल्याचंही त्यांनी नमुद केलं. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या प्रवक्त्याने राडियांच्या व्यवसायातून बाहेर पडण्याच्या निर्णयाबद्दल दुख व्यक्त केलं आहे. राडियांबरोबरचे संबंध व्यवसायिक दृष्ट्या समाधान देणारे होते असं त्यांनी म्हटलं आहे.