राष्ट्रवादी काँग्रेस

'धनंजय मुंडे शरद पवारांपेक्षा मोठे झाले'

बीडमध्ये भाजपच्या खेळीनं विधानपरिषदेत विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडेंना जोरदार धक्का दिलाय.

Mar 21, 2017, 04:22 PM IST

अरुंधती भट्टाचार्यांविरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी आक्रमक

स्टेट बँकेच्या अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्यांनी कर्जमाफीला केलल्या विरोधानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनी स्टेट बँकेच्या मुख्यालयासमोर जोरदार निदर्शनं केली. 

Mar 16, 2017, 05:26 PM IST

'मग मतदार याद्या डिजीटल का नाहीत?'

डिजीटलच्या घोषणा करता मात्र मतदार याद्या का डिजिटल होऊ शकत नाही

Mar 6, 2017, 10:45 PM IST

अजित पवार यांच्या उपस्थितीत नगरसेवकांची बैठक

पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका हातून गेल्यानंतर नॉट रिचेबल झालेले अजित पवार आज पुण्यात आहेत.

Mar 5, 2017, 02:35 PM IST

बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी विरोधी बाकावर, मोठी कसरत?

पिंपरी चिंचवडमध्ये सत्ता जाण्याचा मोठा फटका राष्ट्रवादी काँग्रेसला बसला. मात्र पराभवानंतर आता पक्षसंघटना मजबूत करण्याचं आव्हान पक्षासमोर आहे. त्याचसोबत विरोधी पक्ष म्हणूनही राष्ट्रवादीला भूमिका पार पाडावी लागणार आहे.

Mar 1, 2017, 11:15 PM IST

स्टेजवरच त्यांनी घेतला पवारांचा मुका मग केली टीका

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संसदीय कारकिर्दीमध्ये ५० वर्ष पूर्ण झाली आहेत. 

Feb 27, 2017, 05:36 PM IST

स्टेजवरच त्यांनी घेतला पवारांचा मुका मग केली टीका

स्टेजवरच त्यांनी घेतला पवारांचा मुका मग केली टीका 

Feb 27, 2017, 05:20 PM IST

अजितदादा आणि राज ठाकरे भेटतात तेव्हा....!

२३ फेब्रुवारी २०१७ ला संध्याकाळपर्यंत पिंपरी चिंचवड च्या क्षितिजावर कायम चमकत राहणाऱ्या घडयाळाचे काटे निखळून पडले...! कुठून ही पाहिलं तरी तेजपुंज दिसणारे ते चमचमते घडयाळ आज अंधारात लुप्त झाले...आणि क्षितिजावर कमळाचा उदय झाला...! अनेकांचा विश्वास बसत नसला तरी तसं घडलं होते... गेली कित्येक वर्ष पिंपरी चिंचवड नगरीचे अनभिषिक्त सम्राट म्हणून वावरणाऱ्या अजितदादांना जनतेने पायउतार केले....! दादांच्या पिंपरी महालातून सामानाची आवरा आवर सुरु झाली....! तिकडे नाशिक नगरीत ही ठाकरे राजाचा पराभव झाला होता...! नाशिक नगरीत अगदी दणक्यात धावणाऱ्या रेल्वे इंजिनाची धडधड बंद बंद झाली...! नाशिकच्या महालातून ही ठाकरेंच्या राज च्या सामानाची आवरा आवर सुरु झाली...! सामानाची आवरा आवर सुरु असताना अजित यांनी डोळे मिटले आणि त्यांच्या डोळ्यासमोरून सगळा भूतकाळ सरकू लागला.... पिंपरी चिंचवड.... भोवताली काही खेडी ...त्यांना एकत्र करून बनलेली ही नगरी... त्या नगरीत २५ वर्षापूर्वी दाखल झालो...! नगरीच्या राजकीय पटलावर आपलं अस्तित्व निर्माण करण्यासाठी अनेक स्थानिक सरसेनापती निवडले.... बगता बगता नगरीचे रूप पालटले.... राज्यातच नाही पण देशात हेवा वाटावं अशी नगरी निर्माण केली...!  कोणालाही हेवा वाटावे असे उड्डाणपूल, रस्ते अरे काय नाही केले नगरीसाठी. पण हा पराभव...!

Feb 25, 2017, 02:39 PM IST

'कोणालाही पाठिंबा देणार नाही, लिहून देतो'

राज्य सरकार पडल्यास मी कोणालाही पाठिंबा देणार नाही, हे मी लिहून द्यायला तयार आहे, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलंय.

Feb 18, 2017, 06:58 PM IST