युवराज सिंह

युवीसाठी अजूनही वर्ल्डकपमध्ये खेळण्याची संधी!

२०१५च्या भारतीय वर्ल्डकप टीममध्ये दुर्लक्षित केलेल्या युवराज सिंहसाठी अद्याप टीमचे दरवाजे बंद झाले नाहीयेत. जर टीममधील काही खेळाडू फिटनेस टेस्टमध्ये पास झाले नाही तर युवीला टीममध्ये संधी मिळू शकते. निवडकर्त्यांसमोर तेव्हा युवराज पेक्षा चांगला विकल्प नसेल. 

Feb 4, 2015, 12:29 PM IST

वर्ल्डकपसाठी टीममध्ये युवराज सिंहला सहभागी करण्याची शक्यता!

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये होणाऱ्या ट्रायसीरिज शिवाय पुढील महिन्यात होणाऱ्या वर्ल्डकपसाठी उद्या जेव्हा टीमची निवड करण्यासाठी बैठक होईल, तेव्हा घरगुती मैदानावर युवराज सिंहच्या शानदार खेळीचा विचार केला जाण्याची शक्यता आहे.

Jan 5, 2015, 04:01 PM IST

सेहवाग, गंभीरची भारतासाठी पुन्हा खेळता येण्याची शक्यता धुसर

वाढत चाललेलं वय अन् सुमार फॉर्म लक्षात घेता वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर या एकेकाळच्या भारताच्या स्टार क्रिकेटपटूंनी देवधर करंडकामधून माघार घेतली आहे. 

Nov 20, 2014, 10:55 AM IST

संघात समावेश झाला नाही तर दु:ख होईल : युवराज

कॅन्सरशी लढा देऊन मैदानात नव्याने उभा ठाकल्यानंतर युवराजसिंहने अनेकांना प्रेरणा दिली, मात्र युवराज असा नैराश्यवादी झाल्या सारखा का बोलतोय, असा प्रश्न त्याच्या फॅन्सना पडलाय.

Oct 30, 2014, 04:21 PM IST

क्रिकेट मैदानात बोल्टकडून युवराज सिंहला झटका

सुपरस्टार एथलीट उसेन बोल्ट रनिंग ट्रॅकचा बेताज बादशाह म्हणून ओळखला जातो, मात्र हुसेनने क्रिकेटही उत्तम रित्या खेळतो. भारत दौऱ्यावर आलेल्या या एथलीटने युवराज सिंह कर्णधार असलेल्या टीमला शेवटच्या चेंडूत हरवलं आणि विजय निश्चित केला. जिंकल्यानंतर उसेन बोल्टने आपली ट्रेडमार्क स्टाईलही दाखवली.

Sep 3, 2014, 05:19 PM IST

टीम इंडियाचा क्रिकेटपटू युवराज सिंहच्या वडिलांना अटक

टीम इंडियाचा धडाकेबाज बॅट्समन युवराज सिंहचे वडील योगराज सिंह यांना आज अटक झालीय. शेजाऱ्यांसोबत भांडण केल्याच्या आरोपात पंचकुला पोलिसांनी त्यांना अटक केली. 

Aug 25, 2014, 01:03 PM IST

मास्टर ब्लास्टरच्या 'त्या' ऐतिहासिक जर्सीचा लिलाव

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या खास जर्सीचा लवकरच लिलाव होतोय... ही खास जर्सी घालूनच त्यानं वन डे क्रिकेटमध्ये 200 रन्स ठोकले होते. 

Jul 9, 2014, 12:56 PM IST

युवराजनंतर आता त्याचे वडिलही झगडतायत कॅन्सरशी

क्रिकेटर युवराज सिंह हा दोन वर्षांपूर्वीच कॅन्सरशी दोन हात करून सुखरुप बाहेर पडलाय. पण, आता त्याचे वडील योगराज सिंह यांनाही कॅन्सर झाल्याचं निदान झालंय.

Jun 6, 2014, 02:16 PM IST

केव्हिन पीटरसनकडून युवराज सिंहची स्तुती

दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाचा कर्णधार केव्हिन पीटरसन याने आयपीएलमध्ये फॉर्म पुन्हा गवसलेल्या युवराज सिंह याच्यावर स्तुती सूमनं उधळली आहेत.

May 14, 2014, 09:46 PM IST

मॅच हरल्यानंतर लपली नाही युवीची 'विराट' निराशा

रविवारी झालेल्या वर्ल्डकप ट्वेन्टी-२० चा फायनल सामन्यात टीम इंडियाला श्रीलंकेकडून पराभवाचा चांगलाच धक्का बसला.

Apr 8, 2014, 11:20 AM IST

भारतानं ऑस्ट्रेलियाला अवघ्या 86 धावांत गुंडाळलं

ढाका: भारताने ट्वेण्टी20 विश्वचषकाच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला अवघ्या 86 धावांत ऑलआऊट केलंय. भारताचा हा सलग चौथा विजय नोंदवला आहे. भारताने सामना 73 धावांनी जिंकलाय.

Mar 30, 2014, 10:19 PM IST

युवराज टी-२० वर्ल्डकप खेळणार? संभाव्य यादीत स्थान

कॅन्सरशी लढणारा टीम इंडियाचा सिक्सर किंग युवराज सिंग आणि त्याच्या चाहत्यासाठी एक खुशखबर आहे. युवराज सिंग लवकरच भारतीय टीममध्ये पुनरागमन करणार आहे.

Jul 18, 2012, 04:27 PM IST

'सचिन कुछ खास'ही है- युवराज

युवराजने सचिन तेंडुलकरनं लंडनमध्य़े घेतल्या भेटीमुळे आत्मविश्वास वाढला असल्याचही सांगितलं आहे. त्याचप्रमाणे सचिनच्या महासेंच्युरी प्रतीक्षा करत होतो असंही म्हटलं आहे.

Apr 11, 2012, 08:16 PM IST