लंडन : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या खास जर्सीचा लवकरच लिलाव होतोय... ही खास जर्सी घालूनच त्यानं वन डे क्रिकेटमध्ये 200 रन्स ठोकले होते.
टीम इंडियाचा युवराज सिंह सध्या कँसर पीडितांना मदत करण्यासाठी फंड जमा करतोय. यालाच हातभार लागावा यासाठी या लिलावाचं आयोजन करण्यात आलंय.
14 जुलै रोजी होणाऱ्या या चॅरिटी शोमध्ये विराट कोहली, सचिन तेंडुलकर, केविन पीटरसन, राहुल द्रविड आणि सौरव गांगुली यांसारखे दिग्गज उपस्थित राहतील.
हा लिलाव पार्क लेन इथल्या लंडन हिल्टनमध्ये आयोजित केला जाणार आहे. या लिलावात सहभागी होणाऱ्यांना युवराजसोबत डिनर आणि प्रॅक्टिस सेशनमध्ये सहभागी होण्याचीही संधी मिळेल.
या कार्यक्रमातून मिळणारे पैसे युवराज कँसर चॅरिटी ‘यूवीकॅन’ला दिली जाणार आहे. या संस्थेचं मुख्य उद्दीष्ट आहे कॅन्सर या जीवघेण्या आजाराप्रती लोकांना जागरुक करणं... तसंच कॅन्सर पीडितांसाठी मोफत तपासणीचं आयोजन करणं...
या लिलावातील आणखी एक उल्लेखनीय गोष्ट म्हणजे, ‘कॉमेडी नाईट...’ फेम कपिल शर्माच्या एका स्पेशल कार्यक्रमाचं आयोजनदेखील यावेळी करण्यात आलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.