मॅगी बंदी

'मॅगी'मध्ये विषारी पदार्थ, 'नेस्ले'ची सर्वोच्च न्यायालयात धक्कादायक कबुली

मॅगीमध्ये शिसे असल्याची कबुली नेस्ले कंपनीनेच दिली आहे. त्यामुळे पुन्हा बंदी येऊ शकते.  

Jan 3, 2019, 10:34 PM IST
Nestle Maggie Back In Trouble Again For Noodles Having Posionous Lead In It PT3M6S

नवी दिल्ली । मॅगीमध्ये विषारी पदार्थ, 'नेस्ले'ची न्यायालयात धक्कादायक कबुली

दोन मिनिटांत मॅगी तयार होते, ही जाहिरात तुम्ही पाहिली असाल. त्यानंतर तुम्ही मॅगी खात असाल तर इकडे लक्ष द्या. मॅगीवर पुन्हा बंदी येण्याची शक्यता आहे. मॅगीमध्ये शिसे असल्याची कबुली नेस्ले कंपनीनेच सर्वोच्च न्यायालयात दिली आहे. ही शिसे असलेली मॅगी आम्ही का खावी, असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने मॅगी तयार करणाऱ्या नेस्ले कंपनीला केला आहे. त्यामुळे तुम्ही आरोग्याला घातक ठरणारी मॅगी खाणार का? आणि तुमच्या मुलांना देणार का, असा सवाल आता विचारण्यात येत आहे. त्यामुळे घातक मॅगी खाण्याचे टाळा, असा सल्ला आहार तज्ज्ञांकडून देण्यात येत आहे.

Jan 3, 2019, 10:30 PM IST

बंदी उठली तरी पुन्हा तपासणी झाल्यानंतरच मॅगीची विक्री

मॅगीवर लादण्यात आलेली बंदी उठवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई हायकोर्टानं काल दिला. मात्र प्रत्यक्षात मॅगी विक्रीसाठी आणखी सहा आठवडे वाट पाहावी लागणार आहे. तसेच मॅगीची पुन्हा तपासणी होणार आहे.

Aug 14, 2015, 09:21 AM IST

धक्कादायक: ‘ग्लुकॉन डी’मध्ये सापडल्या अळ्या

नेस्लेच्या मॅगीमध्ये हानीकारक पदार्थ अतिप्रमाणात आढळल्यानंतर आता ‘ग्लुकॉन डी’ या प्रसिद्ध एनर्जी ड्रिंकच्या पॅकेटमध्ये अळ्या सापडल्यानं खळबळ उडाली आहे. उत्तर प्रदेशमधील बुलंद शहर जिल्ह्यात ‘ग्लुकॉन डी’च्या पावडरमध्ये अळ्या सापडल्या आहेत. 

Jun 9, 2015, 06:01 PM IST

नेस्ले सोबतच आता ७ कंपन्यांच्या नूडल्स-पास्ताच्या चौकशीचे आदेश

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं (एफएसएसएआई) नेस्लेसोबतच ७ कंपन्यांच्या मान्यताप्राप्त नूडल्स, पास्ता आणि मॅक्रोनीच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तसंच मान्यता नसलेली उत्पादनं परत घेण्याचे आणि नष्ट करण्याचे आदेश दिले आहेत.

Jun 8, 2015, 06:16 PM IST

'मॅगी' बंदी: गुन्हा दाखल केल्यामुळं प्रीती संतापली

मॅगीची जाहिरात केल्याप्रकरणी आपल्यावर गुन्हा दाखल करण्याच्या बातमीमुळं अभिनेत्री प्रीती झिंटा चांगलीच संतापली आहे. 

Jun 3, 2015, 02:46 PM IST