नवी दिल्ली : भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं (एफएसएसएआई) नेस्लेसोबतच ७ कंपन्यांच्या मान्यताप्राप्त नूडल्स, पास्ता आणि मॅक्रोनीच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तसंच मान्यता नसलेली उत्पादनं परत घेण्याचे आणि नष्ट करण्याचे आदेश दिले आहेत.
प्राधिकरणाने सर्व राज्यांच्या तसंच केंद्रशासित प्रदेशांच्या अन्न सुरक्षा आयुक्तांना दिलेल्या आदेशामध्ये म्हटलंय की, नूडल्स, पास्ता आणि मॅक्रोनी (टेस्टमेकर सहित) हे खाद्यपदार्थ आहेत, त्यामुळं त्यांचं उत्पादन आणि विक्री अन्न सुरक्षा आणि मानक कायदा २००६ मधील कलम २२ अंतर्गत येतात.
प्राधिकरणानं म्हटलं आहे की, नेस्लेच्या 'मॅगी नूडल्स' तसंच अन्य कंपन्यांच्या नूडल्सच्या चाचणीमुळं निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमिवर सर्व उत्पादनांची अधिकृत प्रयोगशाळेत तपासणी झाली पाहीजे. प्राधिकरणानं मान्यताप्राप्त खाद्यपदार्थांच्या चौकशीचे आदेश देतानाच मान्यता नसलेली उत्पादनं बाजारातून परत घेण्याचे आणि नष्ट करण्याचे आदेश दिले आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.