'मॅगी'मध्ये विषारी पदार्थ, 'नेस्ले'ची सर्वोच्च न्यायालयात धक्कादायक कबुली

मॅगीमध्ये शिसे असल्याची कबुली नेस्ले कंपनीनेच दिली आहे. त्यामुळे पुन्हा बंदी येऊ शकते.  

Updated: Jan 3, 2019, 10:46 PM IST
'मॅगी'मध्ये विषारी पदार्थ, 'नेस्ले'ची सर्वोच्च न्यायालयात धक्कादायक कबुली title=

मुंबई : दोन मिनिटांत मॅगी तयार होते, ही जाहिरात तुम्ही पाहिली असाल. त्यानंतर तुम्ही मॅगी खात असाल तर इकडे लक्ष द्या. मॅगीवर पुन्हा बंदी येण्याची शक्यता आहे. मॅगीमध्ये शिसे असल्याची कबुली नेस्ले कंपनीनेच सर्वोच्च न्यायालयात दिली आहे. ही शिसे असलेली मॅगी आम्ही का खावी, असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने मॅगी तयार करणाऱ्या नेस्ले कंपनीला केला आहे. त्यामुळे तुम्ही आरोग्याला घातक ठरणारी मॅगी खाणार का? आणि तुमच्या मुलांना देणार का, असा सवाल आता विचारण्यात येत आहे. त्यामुळे घातक मॅगी खाण्याचे टाळा, असा सल्ला आहार तज्ज्ञांकडून देण्यात येत आहे. 

मॅगीमध्ये शिशाचे प्रमाण होते, अशी कबुली 'नेस्ले इंडिया'ने सर्वोच्च न्यायालयात दिली आहे. त्यामुळे पुन्हा सरकार आणि नेस्ले वाद उफाळण्याची शक्यता आहे. शिशाचे प्रमाण जास्त असल्याच्या कारणावरुन देशात मॅगीवर बंदी घालण्यात आली होती. मात्र, असे काहीही नाही, म्हणून नेस्ले कंपनीने न्यायालयात धाव घेत सरकारने घातलेली बंदी उठविण्यात यश मिळविले होते. त्यामुळे आता जर नेस्लेच कंपनी सांगत असेल की मॅगीमध्ये शिसे आहे तर  सरकार विरुद्ध 'नेस्ले' हा संघर्ष वाढेल. पुन्हा सरकार घातक मॅगीवर बंदी आणू शकते. 

'नेस्ले इंडिया'चे उत्पादन असलेल्या मॅगीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. मॅगीमध्ये शिशाचे प्रमाण जास्त असल्याचे सांगत एनसीडीआरसीने मॅगीविरोधात याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी सुरु झाली आहे. मॅगीमध्ये शिशाचे अतिरिक्त प्रमाण आढळून आल्यामुळे 2015 मध्ये बंदी घालण्यात आली होती. दिल्ली, महाराष्ट्र, केरळ, हरियाणा राज्यासह इतर भागात मॅगीवर बंदी घालण्यात आली होती. बाजारातून मॅगीची उत्पादन मागे घेण्यात आली. या बंदीच्या विरोधात नेस्ले इंडिया कंपनीने न्यायालयात धाव घेतली होती. काही काळानंतर मॅगीवरील बंदी उठवण्यात आली होती.