'मॅगी' बंदी: गुन्हा दाखल केल्यामुळं प्रीती संतापली

मॅगीची जाहिरात केल्याप्रकरणी आपल्यावर गुन्हा दाखल करण्याच्या बातमीमुळं अभिनेत्री प्रीती झिंटा चांगलीच संतापली आहे. 

Updated: Jun 3, 2015, 02:46 PM IST
'मॅगी' बंदी: गुन्हा दाखल केल्यामुळं प्रीती संतापली title=

मुंबई: मॅगीची जाहिरात केल्याप्रकरणी आपल्यावर गुन्हा दाखल करण्याच्या बातमीमुळं अभिनेत्री प्रीती झिंटा चांगलीच संतापली आहे. 

१२ वर्षांपूर्वी केलेल्या जाहिरीतीसाठी माझ्यावर कारवाई होणार? हे कसं शक्य आहे, असा सवाल प्रीतीनं ट्विटरवरून विचारलाय.

सध्या देशभरात मॅगीची तपासणी केली जात असून... दिल्ली आणि केरळमध्ये मॅगीवर बंदी घालण्यात आलीय. तर आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि गुजरातमध्ये मॅगीचे सॅम्पल तपासणीसाठी पाठवले गेले आहेत. 

यासंबंधी अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित आणि प्रीती झिंटा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.