मुंबई महापालिका निवडणूक

मुंबई पालिकेवर भगवा फडकणारच : उद्धव ठाकरे

कोणी कितीही पारदर्शकतेचा विचार केला तरी आमची कामात  पारदर्शकता आहे. जे (भाजप) हा मुद्दा मांडत आहेत, त्यांच्याकडे किती आहे, असा प्रश्न उपस्थित करुन मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकणारच, असा दावा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी वडाळ्यातील सभेत केला.

Feb 11, 2017, 09:42 PM IST

शिवसेनेच्या नोटीस पिरियडबद्दल पाहा मुख्यमंत्री काय म्हणाले...

यंदाच्या मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजप आमनेसामने लढणार आहेत. राज्यात आणि केंद्रात शिवसेना-भाजप युती कायम असली तरी महापालिका निवडणुकीत ही युती नसणार आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत या दोन्ही पक्षातील संघर्ष चांगलाच वाढलाय. 

Feb 11, 2017, 12:57 PM IST

शिवसेनेकडे दाखविण्यासारखं काहीही नाही : मुख्यमंत्री

सध्याची मुंबई महापालिकेची निवडणूक होळीच्या शिमग्यापेक्षा वाईट चालली आहे. दाखवण्यासारखे काही उरले नसल्यामुळं विरोधक काहीही बोलत आहेत. राम मंदिर उभे राहणार आहे, युपीच्या जाहिरनाम्यात आम्ही वचन दिले आहे, असे स्पष्टीकरण देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसनेवर हल्लाबोल चढवला.

Feb 10, 2017, 08:26 PM IST

निवडणुका फडणवीसांच्या राजकीय भवितव्याची लिटमस टेस्ट...

राज्यभरात महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांचा धडाका सुरू असताना सध्या एकच माणूस झंझावाती प्रचार करताना दिसतोय... मराठवाड्यातलं एखादं छोटं गाव असो की मुंबईचं एखादं उपनगर... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाच चेहरा दिसतोय. कारण ही निवडणूक मुख्यमंत्र्यांच्याच राजकीय भवितव्याची लिटमस टेस्ट आहे... 

Feb 10, 2017, 07:30 PM IST

मनसे नगरसेवकाविरोधातील विनयभंग तक्रारीमागे आहे हे कारण...

 सुधीर जाधव यांच्या विरोधातील विनयभंगाच्या तक्रारीमागे राजकीय हेतूतून झाला आहे. विनयभंगाचे प्रकरण खोटे, बदनाम करण्यासाठीच तक्रार करण्यात आली असल्याचे मनसे नगरसेवक संदीप देशपांडे आणि सुधीर जाधव यांच्या पत्नी स्नेहल जाधव यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले. 

Feb 10, 2017, 07:06 PM IST

भाजप विरोधात निवडणूक आयोगाकडे शिवसेनेची लेखी तक्रार

शिवसेना खासदार अनिल देसाई यांची भाजप विरोधात निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीमुळे दोन्ही पक्षात अधिकच ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

Feb 10, 2017, 06:10 PM IST

महापालिका निवडणूक : भाजपचे कोट्याधीश उमेदवार

मुंबई महापालिकेच्या नगरसेवकाचा महिन्याचा पगार असतो 10 हजार रुपये. नगरसेवकाला मिळणारे विविध पगार भत्ते मिळून जरी हिशोब केला तरी वर्षाला काही लाख रुपये नगरसेवकाला मिळतात.

Feb 10, 2017, 11:15 AM IST

जयंत पाटील यांनी शिवसेनेला डिवचले...

  बाळासाहेबांचे खरे गुण असतील आणि जर खरे वाघ असतील तर 23 तारखेला शिवसेना राज्य सरकारचा पाठिंबा काढून घेईल, मात्र तसं झालं नाही तर ते कागदी वाघ हे सिद्ध होईल असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी केलंय. 

Feb 9, 2017, 11:00 PM IST

सत्तेत राहून विरोध करण्याचे खऱे कारण सांगितले उद्धव ठाकरेंनी

 आमच्यावर टीका होते की सत्तेत राहून विरोध का करतात. तर याचं खऱं कारण मी आज सांगतो असे सांगून आपल्या विरोधाची भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज अंधेरीतील सभेत स्पष्ट केली. 

Feb 9, 2017, 09:25 PM IST