महापालिका निवडणूक : भाजपचे कोट्याधीश उमेदवार

मुंबई महापालिकेच्या नगरसेवकाचा महिन्याचा पगार असतो 10 हजार रुपये. नगरसेवकाला मिळणारे विविध पगार भत्ते मिळून जरी हिशोब केला तरी वर्षाला काही लाख रुपये नगरसेवकाला मिळतात.

Updated: Feb 10, 2017, 11:15 AM IST
महापालिका निवडणूक : भाजपचे कोट्याधीश उमेदवार title=

मुंबई : मुंबई महापालिकेच्या नगरसेवकाचा महिन्याचा पगार असतो 10 हजार रुपये. नगरसेवकाला मिळणारे विविध पगार भत्ते मिळून जरी हिशोब केला तरी वर्षाला काही लाख रुपये नगरसेवकाला मिळतात.

पण मुंबईच्या अनेक नगरसेवकांच्या संपत्तीत पाच वर्षांत कुबेरालाही लाजवेल एवढी वाढ होते. एकदा नगरसेवक पद मिळालं की पाच वर्षांत अनेक नगरसेवक गब्बर होतात. पाच वर्षांत त्यांची संपत्ती काही कोटींनी वाढते. यामध्ये सगळ्याच पक्षाच्या नगरसेवकांचा समावेश आहे.