मराठा मोर्चा

मराठा आरक्षण : राज्य सरकारचा खोटारडेपणा उघड - धनंजय मुंडे

राज्यात याआधी मराठा मोर्चे काढण्यात आले. मात्र, त्याची साधी दखल घेण्यात आलेली नाही. राज्य सरकारचा खोटारडेपणा उघड झालाय. 

Aug 9, 2017, 01:23 PM IST

मराठा आरक्षण: विधनपरिषदेत खडाजंगी; राजदंड पळविण्याचा प्रयत्न

मराठा मोर्चा: चर्चा नको आरक्षण द्या - धनंजय मुंडे यांची मागणी

Aug 9, 2017, 01:22 PM IST

सरकारचा वेळकाढूपणा - अजित पवार

 9 ऑगस्ट ला भारत छोड़ो आंदोलन झाले. आज सकल मराठा मोर्चा आहे. 57 मोर्चे निघाले. सर्वांना वाटत होते की सरकार निर्णय घेईल, पण सत्ताधारी पक्ष वेळकाढूपणा काढत आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मराठा मोर्चा संदर्भात सरकारवर टीकेची झोड उठवली. 

Aug 9, 2017, 01:04 PM IST

मराठा आरक्षणावरुन सत्ताधारी-विरोधक आमने-सामने

मराठा क्रांती मूक मोर्चाला मुंबईत सुरुवात झाली आहे. मुंबईत भगवं वादळ धडकलं आहे. मुंबईचं वातावरण मराठामय झालं आहे. तर दुसकरीकडे  मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर विधीमंडळातही सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले आहेत. विरोधकांनी विधानभवनाबाहेर जोरदार घोषणाबाजीही केली. विधानसभेचं कामकाज सुरु होण्याआधीच आमदार आक्रमक झाले होते. अखेर विधानसभेचं कामकाज काही वेळासाठी तहकूब करावं लागलं. 

Aug 9, 2017, 12:44 PM IST

मराठा क्रांती मोर्चा@मुंबई

मराठा क्रांती मूक मोर्चा मुंबईत ( ९ ऑगस्ट २०१७) काढण्यात आला. यावेळी झालेली गर्दी

Aug 9, 2017, 12:33 PM IST

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर जितेंद्र आव्हाडांचं शिवसेनेला आव्हान

मराठा क्रांती मोर्चाला मुंबईत उत्साहात सुरुवात झाली आहे. मोर्चासाठी प्रचंड गर्दी मराठा बांधवांनी केली आहे. राज्यभरातून मराठा माणूस मोर्चात सहभागी होण्यासाठी मुंबईत दाखल झाला आहे. दुसरीकडे विरोधी पक्षातील नेते आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी शिवसेनेला आव्हान केलं आहे

Aug 9, 2017, 12:06 PM IST

मराठा क्रांती मोर्चात आता अभिनेता रितेश देशमुखची उडी

लाखोंच्या संख्येने मराठा क्रांती मोर्च्यात सहभागी झाले आहेत. मुंबईसह राज्यभरातून मराठा मोर्चासाठी मराठा बांधव दाखल झाले आहेत. असं असताना आता बॉलिवूडमधील स्टार अभिनेता रितेश देशमुखने देखील या मराठा क्रांती मोर्चात उडी घेतली आहे.

Aug 9, 2017, 11:56 AM IST

मराठा क्रांती मोर्चा मुंबई: काय आहे कोपर्डी प्रकरण? माहिती आणि घटनाक्रम

कोपर्डी हे एक अहमदनगर जिल्ह्यातील गाव आहे. या गावात एका निष्पाप चिमूरडीवर तीन नराधमांनी पाशवी बलात्कार केला. बलात्कार करून या नराधमांच्या मनातील राक्षस थांबला नाही तर, त्यांनी त्या मुलीचा खून करून तिच्या मृतदेहाचीही विटंबना केली.

Aug 9, 2017, 11:31 AM IST

मुंबईतील वातावरण झालं 'मराठा'मय

मराठा क्रांती मूक मोर्चासाठी रणशिंग थोड्याच वेळात मुंबईत धडकणार आहे. राज्यभरातून मराठा बांधव मंगळवारीच मोठ्या संख्येने मुंबईत दाखल झाले आहेत. मोर्चेकरी मुंबईत दाखल झाल्याने मुंबईतील वातावरण मराठामय झाला आहे. सांगली, सातारा, सोलापूर येथून मराठा बांधव मुंबईत मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. हातात भगवे झेंडे घेत उपनगरांमधून देखील मराठा तरुण मुंबईत दाखल होतो आहे.

Aug 9, 2017, 11:08 AM IST

सोशल मीडियावर मोर्चाची धूम, मराठा क्रांती मोर्चा ट्विटरवरही ट्रेंडींग

मराठा क्रांती मोर्चाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. मुंबईत गर्दीचा उच्चांक नोंदविला जाण्याची शक्यता आहे. कालपासून मोर्चात सहभागी होण्यासाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून लोक येत आहे. हा विक्रमी मोर्चा असण्याची शक्यता वर्तविण्यात येत असताना सोशल मीडियावरही मराठा मोर्चाचा ट्रेंड दिसत आहे.

Aug 9, 2017, 11:03 AM IST

मराठा मोर्चाला शिवसेनेचा पाठिंबा

मराठा मोर्चाला अर्धा तास उरला असताना प्रचंड गर्दी वाढत आहे. राज्यातील सर्वच जिल्ह्यातून अनेक लोक मुंबईत दाखल झालेत. तर कर्नाटकातूनही अनेक जण आलेत. दरम्यान, या मराठा क्रांती मोर्चाला शिवसेनेने आपला पाठिंबा जाहीर केलाय.

Aug 9, 2017, 10:53 AM IST