बीजेपी

नरेंद्र मोदींची पाटण्यात टी स्टॉलवर ‘छाप’

सध्या देशात भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींची क्रेझ वाढलेली दिसून येत आहे. बिहारमधील पाटण्यामध्ये आता रस्त्याच्याकडेला असणाऱ्या टी स्टॉलवर मोदींची छाप दिसणार आहे. ‘नमो टी स्टॉल` उभारण्याची तयारी भाजपच्या नेत्यांनी केली आहे.

Oct 4, 2013, 11:40 AM IST

नकाराधिकाराचं मोदींकडून स्वागत!

गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी, सर्वोच्च न्यायालयाच्या मतदान नाकारण्याचा अधिकार` या निर्णयाचे स्वागत केले आहे.

Sep 27, 2013, 08:59 PM IST

येडियुरप्पा पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करणार

भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी दिलेले कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. भाजपने नरेंद्र मोदी यांचे पंतप्रधान पदासाठी नाव जाहीर केल्यानंतर येडियुरप्पा यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यामुळे येडियुरप्पा भाजपमध्ये आले तर त्याचे श्रेय मोदींना असेल, अशी माहिती राजकीय सूत्रांकडून देण्यात आली आहे.

Sep 18, 2013, 02:26 PM IST

अडवाणी मूर्ख आहेत – जेठमलानी

नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीला विरोध करणारे भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यावर ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ राम जेठमलानी यांनी सडकून टीका केलीय.

Sep 13, 2013, 07:29 PM IST

लोकसभेत जमीन अधिग्रहण आणि पुनर्वसन विधेयक मंजूर

लोकसभेत मंजुरीसाठी ठेवलेल्या `जमीन अधिग्रहण आणि पुनर्वसन विधेयक २०११` ला मंजुरी मिळाली आहे. अन्न सुरक्षा विधेयकानंतर यूपीए सरकारचं आणखी एक महत्वाचं विधेयक लोकसभेत मंजूर झालं आहे.

Aug 30, 2013, 09:01 AM IST

नरेंद्र मोदींची टीका योग्य नाही - अडवाणी

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर केलेली टीका योग्यवेळी नव्हती. स्वातंत्र्यदिनी त्यांनी टीका करणे योग्य नाही, अशी नाराजी भाजपचे ज्येष्ठ नेत लालकृष्ण अडवाणी यांनी व्यक्त केली. मोदींना हा घरचा आहेर असल्याचे म्हटले जात आहे.

Aug 16, 2013, 09:36 AM IST

नरेंद्र मोदींनी मानले ब्रिटनचे आभार!

नरेंद्र मोदी यांना लंडनभेटीचे आमंत्रण मिळाले आहे. ब्रिटनमधील दोन प्रमुख राजकीय पक्षांनी मोदींना लंडनभेटीचे निमंत्रण दिले आहे. याबद्दल मोदांनी ट्विट करताना म्हटलं आहे, मला आनंद आहे. ज्या खासदारांनी प्रयत्न केले त्यांचा मी आभारी आहे.

Aug 14, 2013, 12:13 PM IST

नरेंद्र मोदी निघाले लंडनला!

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना अमेरिकेचा व्हिसा देऊ नये म्हणून काही भारतीय खासदारांनी फिल्डींग लावली. यावरून बराच वाद झाला. तर कट्टर हिंदूत्ववादी मोदी आहेत, असा ठपका ठेवत काही देशांनी मोदींना परदेश बंदी केली. मात्र, आता ब्रिटनने मोदींना व्हीसा देण्याची तयारी दाखविली आहे. त्यामुळे मोदींचा लंडन प्रवासाचा मार्ग मोकळा झाला आहे.

Aug 14, 2013, 11:37 AM IST

किश्तवाड हिंसाचार, राबर्ट वडेरा प्रकरणावरुन विरोधक आक्रमक

संसदेत विविध मुद्यांवरुन विरोधकांनी सरकारला धारेवर धरलंय..त्यामुळं गेला आठवडा आणि कालच्या दिवशी संसदेचं कामकाज व्यवस्थित होऊ शकलं नाही. हा तिढा सोडवण्यासाठी आता कमलनाथ यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावलीय.

Aug 13, 2013, 01:02 PM IST

...तर भारतरत्न किताब परत करू- अमर्त्य सेन

‘वाजपेयी यांची इच्छा असेल तर आपण भारतरत्न किताब परत करु’ असं सेन यांनी विधान केल्यांन खळबळ माजलीय.

Jul 25, 2013, 09:43 PM IST

मोदींना व्हिसा देऊ नका, खासदारांचे ओबामांना पत्र

गुजरातचे मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे लोकसभा निवडणूक प्रचार समिती प्रमुख नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचा व्हिसा कसा मिळणार नाही, याची मोर्चेबांधणी विरोधकांनी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून भारतातील काही खासदारांनी अध्यक्ष बराक ओबामा यांना पत्र पाठविले आहे. यावर या खादसारांच्या सह्या आहेत.

Jul 24, 2013, 03:58 PM IST

नरेंद्र मोदींची नवी टीम, आडवाणी, गडकरींना स्थान

भाजपच्या २०१४च्या निवडणूक समितीची घोषणा काल करण्यात आली. त्यासाठी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली एक केंद्रीय समिती तसंच २० विविध समित्या स्थापन करण्यात आल्यात.

Jul 20, 2013, 08:15 AM IST

अडवाणींचे घोडं न्हालं, घेतली भागवतांची भेट

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि सरसंघचालक मोहन भागवत यांची बहुचर्चित भेट आज संघाच्या मुख्यालयात अखेर पार पडली. सुमारे तासभर या दोघांमध्ये चर्चा झाली.

Jun 20, 2013, 08:40 PM IST

बिहारमध्ये नितीशकुमारांना काँग्रेसने तारले

बिहारमध्ये भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा पाठिंबा काढून घेतला खरा. मात्र, आज विधानसभेच्या विशेष अधिवेशनात काँग्रेसने साथ दिल्याने नितीशकुमार यांनी सहज विश्वासदर्शक ठराव जिंकला.

Jun 19, 2013, 10:00 PM IST

राज ठाकरेंशिवाय सत्तांतराची ताकद महायुतीत- आठवले

राज ठाकरे यांना बाजूला ठेवूनदेखील राज्यात सत्तांतर घडविण्याची ताकद शिवसेना-भाजप अन् रिपाइंच्या महायुतीत आहे, असे प्रतिपादन रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले.

Jun 2, 2013, 08:42 AM IST