आयुक्तांविरोधात मनसेची अविश्वास प्रस्तावाची सूचना
मुंबई महापालिका आयुक्त सीताराम कुंटेंविरोधात मनसेनं अविश्वास प्रस्तावाची सूचना दिलीये.
मनसेचे नवनियुक्त गटनेते संदीप देशपांडे यांनी महापौर सुनिल प्रभू यांना याबाबत पत्र पाठवलंय.
महापालिकेचा सफाई कर्मचारी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर!
इच्छाशक्तीच्या बळावर मुंबई महापालिकेचा सफाई कर्मचारी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेलाय. चतुर्थश्रेणी कर्मचारी उच्च शिक्षण घेऊन परदेशातील विद्यापिठात अभ्यासाठी जात असल्याची ही पहिली वेळ आहे. पण मुंबई महापालिकेला त्याचं फारसं अप्रूप नसल्याचं दिसतंय.
Oct 6, 2013, 08:57 PM ISTमुंबई अजूनही ‘खड्ड्यात’!
मुंबई महापालिका आयुक्तांनी संपूर्ण शहर खड्डेमुक्त करण्याची दिलेली 25 ऑगस्टची डेडलाईन संपलीय. अजूनही अनेक रस्त्यांवर खड्डयांचं साम्राज्य दिसून येतंय. यामुळं गणेशमूर्ती मंडपात घेवून येताना गणेशोत्सव मंडळांना त्रास होतोय.
Aug 27, 2013, 09:03 AM ISTमुंबईकरांनो उद्यापासून ‘खड्डे’ गायब?
मुंबईकरांसाठी तशी खुशखबर आहे. मात्र ही न्यूज खरंच खुशखबर ठरते का यासाठी मुंबईकरांनो तुम्हाला उद्याची वाट पाहावी लागणार आहे. कारण सोमवारपासून मुंबईकरांना मुंबईतल्या रस्त्यांवर एकही खड्डा दिसणार नाही. हे आम्ही नाही म्हणत... तर असा दावा पालिकेनं केला होता.
Aug 25, 2013, 02:08 PM IST‘राजा’च्या मंडपाला महापालिकेची परवानगी
गेल्या वर्षीचे खड्डे न बुजविल्यामुळं आधी मागील वर्षीचा १९ लाखांचा दंड भरा, तेव्हाच मंडपासाठी परवानगी देऊ असा पवित्रा महापालिकेनं घेतला होता. मात्र दंडाची रक्कम प्रॉपर्टी टॅक्समधून वसूल केली जाईल, अशी भूमिका घेत आता मंडपासाठीची परवानगी महापालिकेनं दिलीय.
Aug 7, 2013, 09:47 AM ISTशेकडो तरुणींनी मुंबईत काढली फुटपाथवर रात्र
मुंबईत बीएमसीत नर्सच्या मुलाखतीसाठी आलेल्या शेकडो तरुणींना बीएमसी प्रशासनाच्या बेजबाबदारपणाचा फटका बसलाय. या तरुणींना संपूर्ण रात्र फुटपाथवर काढावी लागली.
Apr 15, 2013, 08:56 AM ISTसेनेच्या दसरा मेळाव्याला परवानगी नाकारली!
शिवसेनेच्या शिवाजी पार्कवरच्या यंदाच्या दसरा मेळाव्याला मुंबई महापालिकेनं परवानगी नाकारलीय. गेली दोन वर्षं शिवाजी पार्कवर झालेल्या दसरा मेळाव्यामध्ये आवाजाच्या मर्यादेचं उल्लंघन झालं होतं.
Oct 10, 2012, 05:48 PM ISTपालिका संपकरी कर्मचाऱ्यांना बोनस मिळणारच
मुंबई महापालिकेने १९ सप्टेंबर २०११ च्या संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांना बोनस न देण्याचा निर्णय घेतला होता. पालिका प्रशासनाच्या या निर्णयाविरोधात म्युनिसिपल मजदूर युनियनने औद्योगिक न्यायालयात दाद मागितली होती.
Apr 18, 2012, 07:47 PM ISTश्रीमंत महापालिकेचा गरीब कारभार
मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्प आहे 26 हजार 581.2 कोटी रुपयांचा आहे. हे बजेट कोणाच्याही डोळ्यात भरावं असंच आहे..कारण हा आकडाच तेव्हडा मोठा आहे...यंदाचं बजेट 23 हजार कोटी रुपयांचा आकडा पार करील असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.. पण हे बजेट थेट 26 हजार 581.2 कोटी रुपयांवर जावून पोहोचला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या बजेटमध्ये तब्बल 26 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
Mar 20, 2012, 11:07 PM ISTमुंबईत निवडणूक आचारसंहिता आजपासून?
मुंबई महानगरपालिका निवडणुका येत्या फेब्रुवारी महिन्यात होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे, महापालिका निवडणूकांच्या तारखा आज दुपारी पत्रकार परिषद घेऊन जाहीर करण्यात येईल. तर त्यामुळे मुंबई पालिकेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे आहे.
Jan 3, 2012, 05:06 PM IST