बनावट नोट असेल तरी राहा बिनधास्त?
तुमच्याकडे बनावट नोट आहे का? पण आता काळजी नको. कारण बनावट नोटांच्या बदली तुम्हाला मिळणार खऱ्या नोटा. बनावट नोटांविरोधात सरकारचा नवा प्रयत्न चालू आहे. तुमच्याकडे जर खोटी नोट आली तर घाबरून जाण्याचे काही कारण नाही कारण आता बँका देणार खऱ्या नोटा.
Jul 5, 2013, 03:52 PM ISTसुवर्णसंधी : सरकारी बँकेत ५० हजार जागा!
आता सरकारी बँका मिळवून देणार आहे ५०००० हजार बेरोजगारांना नोकरी. चालू वर्ष २०१३-१४ च्या दरम्यान संपूर्ण देशात साधारण ८ हजार शाखा खोलण्यात येणार आहेत. त्यामुळे साधारण ५०००० लोगांना या संधीचा फायदा उचलता येणार आहे.
Jul 4, 2013, 12:47 PM ISTखोटे सोने तारण ठेऊन बँकेलाच गंडवले!
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंढरपूर आणि टेंभूर्णी शाखेला बनावट सोनं तारण ठेवून गंडवल्याचं समोर आल्यानं जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात खळबळ उडालीय. बँकेच्या सराफानंच बँकेला गंडवलंय.
Jun 26, 2013, 07:45 PM ISTतो झोपला की-बोर्डवर, ३० कोटी डॉलर्स झाले ट्रान्सफर!
बँक कर्मचाऱ्याला काम करता करता डुलकी लागली. आणि की-बोर्डवरच तो कर्मचारी झोपी गेला. त्यामुळे की- बोर्डवरील काही बटनं चुकून दाबली गेली आणि सुमारे ३० कोटी डॉलर्सची अमाउंट दुसऱ्याच अकाउंट ट्रान्सफर झाली.
Jun 12, 2013, 03:50 PM ISTपाकिस्तानी बँकांच्या शाखा उघडणार भारतात!
पाकिस्तानातील राष्ट्रीय बँकांपैकी दोन बँकांना भारतात आपल्या शाखा उघडण्याची परवानगी मिळाली आहे. पाकिस्तानला भारतात गुंतवणूक करण्याची परवानगी मिळाल्यानंतर या बँकांना परवानगी मिळाली आहे.
May 29, 2013, 07:47 PM ISTसोने गहाण ठेवू नका, कर्जाचं काही खरं नाही!
आंतरराष्ट्रीय आणि स्वदेशी मार्केटमध्ये सोने किमतीत मोठ्या प्रमाणात घट होत आहे. सोन्याचा घसरता दर कर्जासाठी मारक ठरला आहे. बॅंकेने सोन्यावर कमी कर्ज देण्याची योजना आखली आहे. त्यामुळे सोन्याची किंमत घटल्याचे दिसत आहे.
May 28, 2013, 09:50 AM ISTLIC सुरू करणार देशातील सर्वांत मोठी बँक
LIC म्हणजेच भारतीय जीवन विमा महामंडळ आता देशातील सर्वांत मोठी बँक स्थापन करणार आहे. एलआयसी देशात सर्वाधिक मोठं जाळं असणारी बँक सुरू करणार आहे. LIC ने जर बँक सुरू केली, तर देशभरात १ लाखाहून अधिक नव्या नोकऱ्या निर्माण होण्याची शक्यता आहे.
Apr 21, 2013, 10:28 PM ISTज्यांनी बँका काढल्या नाहीत, त्यांनी शिकवू नये- अजितदादा
काल नाशिकमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलेल्या टीकेला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ज्यांनी आयुष्यात एकही सहकारी संस्था काढली नाही की चालवली नाही.
Jan 19, 2013, 04:47 PM ISTआज आणि उद्या बँका बंद...
आपल्या विविध मागण्यासाठी ‘ऑल इंडिया बँक एम्पॉईज असोसिएशन’नं बुधवार-गुरुवार असा दोन दिवसांचा संप पुकारलाय. यामुळे ग्राहकांना मात्र आपल्या बँकेतील व्यवहारांसाठी आणखी दोन दिवसांची वाट पाहावी लागणार आहे.
Aug 21, 2012, 09:51 AM ISTचेक नाही वटला, तर बँक वठणीवर येणार...
बँकेचे व्यवहार म्हटंले की, अनेक वेळेस वेळकाढूपणा केला जातो. मग त्यात महत्त्वाच काम म्हणजे आपल्याला मिळालेला चेक वटला जाणं.
Aug 15, 2012, 01:40 PM ISTचेकऐवजी करा इलेक्टॉनिक पेमेंट...
चेकचा वापर कमी करा, असे आदेश अर्थ मंत्रालयानं सरकारी बँकांना दिले आहेत. चेकऐवजी ई-वितरणाचा वापर वाढवा, असे सरकारकडून लिहिलेल्या पत्रात नमूद करण्यात आलंय. यामुळे वितरणावर होणाऱ्या खर्चात कपात होणार आहे. चेक तयार करण्यासाठी आणि चेक वठवण्यासाठी बँका दरवर्षी आठ हजार कोटी रुपये खर्च करतायेत.
Jul 3, 2012, 11:23 PM ISTपैसे मोजण्यासाठी.. पैसे मोजा...
राष्ट्रीयकृत बँकांनी एक अफलातून निर्णय घेऊन ग्राहकांना दणका दिला आहे. ठराविक मर्यादेपेक्षा अधिक नोटा मोजण्यासाठी ग्राहकांना पैसे द्यावे लागणार आहेत. मात्र आपलेच पैसे मोजण्यासाठी पैसे मोजावे लागत असल्यानं ग्राहकांनी या निर्णयाला विरोध दर्शवला आहे.
Jan 9, 2012, 11:48 AM ISTइंदापूर अर्बन बँकेत सावळागोंधळ
इंदापूर अर्बन बँकेमध्ये राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेतला सावळागोंधळ उघड झाला आहे. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना निधीत इंदापूरमधल्या एका शेतकऱ्याला घरदुरुस्तीचेकर्जमाफ करण्यात आलं आहे. चंद्रकांत चव्हाण असं या शेतकऱ्याचं नाव आहे.
Jan 4, 2012, 06:25 PM ISTपुन्हा एकदा शेतकऱ्याची आत्महत्त्या
धुळे जिल्ह्यातील विंचूर गावातील प्रकाश खैरनार या शेतकऱ्यानं गळफास लावून आत्महत्या केली आहे. वातावरणातील बदलामुळे पिकांपासून उत्पादन मिळत नसल्यानं शेवटी प्रकाश खैरनार यांनी आपली जीवनयात्रा संपवली.
Nov 22, 2011, 01:53 PM IST