www.24taas.com, नवी दिल्ली
LIC म्हणजेच भारतीय जीवन विमा महामंडळ आता देशातील सर्वांत मोठी बँक स्थापन करणार आहे. एलआयसी देशात सर्वाधिक मोठं जाळं असणारी बँक सुरू करणार आहे. LIC ने जर बँक सुरू केली, तर देशभरात १ लाखाहून अधिक नव्या नोकऱ्या निर्माण होण्याची शक्यता आहे.
LIC चा आर्थिक व्यवहार मोठा आहे. ही देशातील मोठी वित्तीय संस्था आहे. जीवन विम्यातून १४ लाख कोटींचा निधी LIC कडे जमा आहे. एवढा मोठा डोलारा संभाळणाऱ्या LIC ने बँकिंगमध्ये पाऊल ठेवल्यास निश्चितच त्याचा फायदा आपल्याला होईल. LIC ची बँक कशी असेल, यासंदर्भात LIC काही महिन्यांत रिझर्व्ह बँकेकडे अर्ज देणार आहे. RBI कडून परवानगी मिळताच LICच्या बँका सुरू होणार आहेत.
LIC ने बँक सुरू केल्यावर भारतभरात नोकऱ्या उपलब्ध होतील. सध्या LICमध्ये १ लाख ३० हजार कर्मचारी काम करत आहेत. सुमारे तितकेच कर्मचारी LICच्या बँकिंगसाठी लागणार आहेत. या बँकिंगमध्येही मोठ्य़ा प्रमाणावर गुंतवणूक होणार आहे.